Pune : बाह्यवळण मार्गावर आंबेकर चौकात तीन वाहनांचा विचित्र अपघात

अपघाताचे वृत्त समजताच कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार आशिष गरुड,
अपघात
अपघातsakal

उंड्री : कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर पिसोळी (ता. हवेली) येथील आंबेकर चौकात दोन ट्रक आणि कारचा विचित्र अपघात झाला. या अपघातात जीवितहानी टळली मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना आज (बुधवार, ता. १४ डिसेंबर, २०२२) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

पोलिसांनी सांगितले की, आंबेकर चौकातून ट्रक वळण घेत होता, त्यावेळी मिक्सरचा ट्रक पुढे जात असताना कारला घासला गेला. त्यामुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार आशिष गरुड, पोलीस हवालदार राजाराम कोलते, महिला वाहतूक पोलीस प्रियांका विटकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन कार आणि मिक्सर ट्रक बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com