Pune Accident News : कंटेनरला धडक दिल्यामुळे लातूरच्या तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Accident Latur youth dies after being hit by container truck police

Pune Accident News : कंटेनरला धडक दिल्यामुळे लातूरच्या तरुणाचा मृत्यू

पुणे : कंटेनरला पाठीमागून धडक दिल्यामुळे लातूर जिल्ह्यातील एका पिकअप व्हॅन चालकाचा मृत्यू झाला. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती ता. हवेली येथे पाच मार्च रोजी पहाटे घडली.

महादेव वामन जोगदंड (वय २७, रा. सहजपूर, ता. दौंड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी आहे. याप्रकरणी देविदास वाघमारे (वय ३२ रा. सहजपूर, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव जोगदंड हा पुणे-सोलापूर महामार्गावरून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पिकअप व्हॅन घेऊन जात होता. फिर्यादी वाघमारे त्याच्यासोबत प्रवास करीत होते.

जोगदंड याचे पिकअप व्हॅनवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे जोगदंड याचा मृत्यू झाला. तर, वाघमारे यांच्या हाताला दुखापत झाली. यामध्ये पिकअप व्हॅनचेही नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हंबीर करीत आहेत.