Fri, June 2, 2023

Pune Accident News : दहाचाकी डंपरखाली चिरडून मेकॅनिकचा मृत्यू
Published on : 5 March 2023, 2:23 pm
पुणे : दहाचाकी डंपरने धडक दिल्याने अंगावरून चाक गेल्यामुळे एका मेकॅनिकचा मृत्यू झाला. ही घटना पुणे-नगर रस्त्यावरील विमाननगर येथील फिनिक्स मॉलसमोर शुक्रवारी रात्री घडली. संजयकुमार मिश्रीलाल पासवान (वय २८, उबाळेनगर, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गजेंद्र रगडे (वय २२, रा. उपळाइनगर, बार्शी) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रगडे हे त्यांच्या ट्रकच्या दुरुस्तीचे काम करून मेकॅनिक संजयकुमार पासवान यांना दुचाकीवर पाठीमागे बसवून वाघोली येथे सोडण्यासाठी जात होते. त्यावेळी भरधाव दहाचाकी डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात मेकॅनिक पासवान याच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.