पुण्यात लॉ कॉलेज रोडवर वीजेचा धक्‍का लागून एका व्यक्तीचा मृत्यू

रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या डिपीमध्ये हात घातल्याने वीजेचा जबर धक्का बसून एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
पुण्यात लॉ कॉलेज रोडवर वीजेचा धक्‍का लागून एका व्यक्तीचा मृत्यू

पुणे : रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या डिपीमध्ये हात घातल्याने वीजेचा जबर धक्का बसून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लॉ कॉलेज रस्त्यावरील जर्मन बेकरीसमोरील पदपथावर घडला. किरण राजकुमार (रा.त्रिवेंद्रम, केरळ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण राजकुमार त्रिवेंद्रम येथील एका महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करीत होता. मात्र तो व्यसनाच्या आहारी गेल्याने तसेच त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याने त्याला कामावरुन कमी करण्यात आले होते. दरम्यान, गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तो लॉ कॉलेज रस्त्यावरील जर्मन बेकरीसमोरील पदपथावरून स्वतःशी बोलत जात होता. त्यावेळी त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या डीपीचे दरवाजे उघडले.

पुण्यात लॉ कॉलेज रोडवर वीजेचा धक्‍का लागून एका व्यक्तीचा मृत्यू
पुणे : रेमडेसिव्हिरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या

त्यानंतर त्याने स्वतःचे दोन्ही हात डिपीमध्ये घातले. त्यामुळे त्याला विजेचा जबर धक्का बसला. त्यामुळे तो पदपथावर पडला. ही घटना तेथून जाणाऱ्या नागरीकांनी पाहिली. त्यांनी याबाबत तत्काळ डेक्कन पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यास ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर त्यास मृत घोषित करण्यात आले. राजकुमारकडे त्याच्या वाहनाची कागदपत्रे सापडली. त्यावरुन त्याच्या घरचा पत्ता व फोन नंबरचा शोध लागला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यावेळी त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, त्याचे कुटुंबीय दोन दिवसात पुण्यात दाखल होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com