पुणे : गतिरोधकामुळे दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मार्केट यार्ड येथील वखार महामंडळ चौकातील गतिरोधकाचा अंदाज दुचाकीस्वारास न आल्याने भरधाव दुचाकी एक ते दिड फुट उंच उडुन दुभाजकाला धडकली. त्यानंतर दुचाकी घासत पुढे गेली. त्यावेळी दुचाकीस्वार रस्त्यावर पडुन जबर जखमी झाल्याने त्याचा मृत्यु झाला.

पुणे : मित्राला पुणे स्टेशन येथे सोडविण्यासाठी जात असलेल्या दुचाकीस्वारास गतिरोधकाचा अंदाज न आल्याने भरधाव दुचाकी गतिरोधकावरून उडून दुभाजकाला धडकली.रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मार्केट यार्ड परिसरात सोमवारी सकाळी साडे पाच वाजता घडली. 

हमीद मुर्तुजा हुसेन (वय 34, रा. अश्रफनगर, कोंढवा, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अरमान खान (वय 26, रा.कोंढवा) यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे हुसेन हे मित्र होते. फिर्यादी हे फरशी बसविण्याचे, तर हुसेन हे प्लंबिंगचे काम करत होते. दरम्यान फिर्यादी यांना सोमवारी त्यांच्या उत्तर प्रदेशमधील मूळ गावी जायचे होते. त्यासाठी हुसेन हे त्यांच्या दुचाकीवरून पुणे स्टेशन रेल्वेस्थानक फिर्यादीला सोडण्यासाठी निघाले होते. दुचाकी मार्केट यार्डजवळील वखार महामंडळ चौकामध्ये आली असताना हुसेन यांना गतिरोधकाचा अंदाज आला नाही. त्यामुळे भरधाव दुचाकी गतिरोधकावर एक ते दीड फूट उंच उडून दुभाजकावर आदळली. त्यावेळी फिर्यादी व हुसेन दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात हुसेन हे गंभीर जखमी झाले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 
 

Web Title: Pune: Accidental Death of Two Wheeler rider due to speed breaker

टॅग्स