पुणे : लॉज मालकास मारहाण प्रकरणातील आरोपी अटकेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

पुणे : कामावरुन कमी केल्याचा राग आल्याने लॉज मालकाला जबर मारहाण करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या यूनिट दोनच्या पथकाने अटक केली. विशेषत: कामगाराने लॉज मालकास मारण्यासाठी मुंबईच्या गुन्हेगारांना सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
 
शरीफ आबेदआली शेख ( वय 22, जवहेरी बाजार, मुंबई, मूळ पश्चिम बंगाल), मकबुल निजामुल शेख (वय 21, रा.जवहेरी बाजार, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रविन्द्र शामकुमार अगरवाल यांच्या राजतिलक लॉजमध्ये अमरसिंग जोहरसिंग कुँवर (वय 60, कस्तूरी चौक, मूळ नेपाळ) हा अनेक वर्ष काम करत होता. मालक जास्त काम करुन घेतो, जेवायला देत नाही आणि पगारही व्यवस्थित देत नाही, या कारणावरुन कुँवरचे मालक अगरवाल समवेत वाद झाला होता. त्यामुळे त्यास कामावरुन काढले होते. त्याचा राग कुँवरच्या मनात होता.

दरम्यान, लॉजसमोरील एका सोन्याच्या दुकानामध्ये माती गोळा करणारे आणि राजतिलक लॉजमध्ये राहणाऱ्या शरीफ शेख व मकबुल शेख यांच्याशी कुँवरची ओळख झाली होती. त्याने दोघांना लॉजमालकास मारण्याबाबत विचारणा केली, त्यावेळी 15 हजार रूपयांमध्ये जिवे मारण्याचे ठरले. त्यानुसार आरोपींनी 5 हजार रुपये आगाऊ घेऊन बुधवारी अगरवाल यांच्यावर हल्ला केला.

Web Title: Pune: accused arrested for beating the owner of the Lodge