पुणे : पालखी विसाव्याच्या ठिकाणी वैष्णवभक्तांसाठी प्रशासन सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्याची सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून दिली आहे.

पुणे : पालखी विसाव्याच्या ठिकाणी वैष्णवभक्तांसाठी प्रशासन सज्ज

उंड्री : दोन वर्षानंतर वारकरी सांप्रदायाचा सोहळा थाटामाटात पंढरीकडे निघाला आहे. हवेली तालुक्यातून वैष्णव भक्तांमध्ये मोठी गर्दी होते. त्यांची गैरसोय होणार याची दखल घेतली आहे. पालखी विसाव्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाणी, तसेच आरोग्याची सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून दिली आहे. वारकऱ्यांची कोणतीही अडचण होणार नाही, याची दक्षता घेतली आहे, असे काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

वडकी नाला (ता. हवेली) येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उद्या (शुक्रवार, दि. २४ जून, २०२२) रोजी दुपारी विसाव्याच्या ठिकाणी येत आहे. त्यानिमित्त आमदार जगताप यांनी पाहणी केली. याप्रसंगी बाळासाहेब साबळे, सचिन मोडक, दिलीप गायकवाड, योगिता गायकवाड, विद्या लडकत, महेश जाधव, संजय हरपळे, शीतल मोडक, नेहा मोडक, अविनाश मोडक, महेश जाधव, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.

तहसीलदार तृप्ती कोलते म्हणाल्या की, वैष्णवभक्तांसाठी ग्रामस्थांनी उत्तम रीतीने नियोजन केले आहे. प्रशासनाच्या वतीने पाण्याचे टँकर आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दिवे घाटातील नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होते. त्यासाठी पोलीस यंत्रणेने विशेष उपाययोजना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वडकीचे सरपंच अरुण गायकवाड म्हणाले की, पालखी विसाव्याच्या ठिकाणी दीड-दोन तास थांबते. यावेळी भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी दर्शनबारीची व्यवस्था केली आहे. विसाव्यानंतर दिवे घाटात माऊलींच्या रथाला मानाच्या पाच बैलजोड्या आणि इतरही शेतकरी बैलजोड्या घेऊन येतात, त्यांनाही सहभागी करून घेतले जाते, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Pune Administration Ready Vaishnava Devotees Palkhi Resting Place

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top