पुण्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Non Teaching Staff Agitation

प्रलंबीत मागण्यांसाठी लेखी आश्वासन मिळाले नाही, म्हणून महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आज काम बंद आंदोलन केले होते.

Teachers Agitation : पुण्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

पुणे - प्रलंबीत मागण्यांसाठी लेखी आश्वासन मिळाले नाही, म्हणून महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आज काम बंद आंदोलन केले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसह शहरातील सर्व महविद्यालयांतील कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले होते. ऐन परीक्षेच्या काळात कर्मचारी संपावर गेल्याने महाविद्यालयांचे कामकाज प्रभावी झाले आहे.

आश्वासित प्रगती योजना, ५८ महिन्याची थकबाकी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र जोपर्यंत मागण्या लेखी मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे जो पर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही. तो पर्यंत कामावरील बहिष्कार कायम राहणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

बारावीच्या परीक्षांवर परिणाम?

महाविद्यालयांबरोबरच कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचारीही आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे बारावीच्या परीक्षांच्या नियोजनाला फटका बसण्याची शक्यता प्राचार्यांनी व्यक्त केली असून, ऐन परीक्षेत कर्मचारी संपावर गेल्यामुळे परीक्षा विभागाची तारांबळ उडणार आहे.