
Pune : ग्रामीण भागातील युवकांनी कृषी व साहसी पर्यटनाद्वारे शाश्वत पर्यटन ही संकल्पना
पारगाव : ग्रामीण भागातील युवकांनी कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, कॅरावॅन पर्यटन द्वारे शाश्वत पर्यटन ही संकल्पना राबवावी असे प्रतिपादन महाराष्ट्र पर्यटन संचालनालय च्या उपसंचालिका सुप्रिया करमरकर/ दातार यांनी केले.
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथे वायाळ फार्म कृषी पर्यटन केंद्रावर शिवजयंती आणि महिला दिना निमित्त महाराष्ट्र पर्यटन संचालनालय आणि वायाळ कृषी पर्यटन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने युवक युवतींसाठी एक दिवसाचे आदरतिथ्य, पर्यावरण संवर्धन, कृषी विकास शाश्वत पर्यटन विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना सुप्रिया करमरकर/ दातार बोलत होत्या .
याप्रसंगी आयुर्वेदाचार्य आणि वेलनेस कोच डॉ वैशाली लोढा, वनपाल सोनल भालेराव कृषी सहाय्य्क निशा शेळके, उद्योजक संदीप निकम, बाळासाहेब आदक, सागर गायकवाड, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मुक्ताजी वायाळ, बंटी लबडे, अक्षय ढोबळे उपस्थित होते. करमरकर यांनी कृषी पर्यटन, साहसी पर्यटन,
कॅरावन पर्यटन आणि शाश्व्त पर्यटन वर मार्गदर्शन केले. डॉ लोढा यांनी आदरातिथ्य, भारतीय संस्कृती, पौष्टीक आहाराचे महत्व आणि आरोग्यावर मार्गदर्शन केले. सोनल भालेराव यांनी पर्यावरण संवर्धन, बिबट मानव सहवास यावर मार्गदर्शन केले शेळके यांनी शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. सहभागी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले.