Sat, Sept 30, 2023

पुणे विमानतळावर प्रवाशांचे 6 तासांपासून हाल; दिल्लीला जाणारे विमान अजून आलेच नाही | Pune Airport
Published on : 4 May 2023, 6:30 am
पुणे : पुणे विमानतळावर प्रवाशांची गैरसोय झाल्याची माहिती समोर आली असून सकाळी ७ वाजल्यापासून प्रवाशी खोळंबले आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अधिक माहितीनुसार, दिल्लीकडे जाणारे विमान सकाळी ६.३० वाजता पुणे विमानतळावरून उड्डाण करणार होते, मात्र विमान अद्याप पुणे विमानतळावर आलेले नाही. त्यामुळे १०० हून अधिक प्रवाशी खोळंबले आहेत. सदर विमान हे एअर एशिया कंपनीचे असून ते पुणे - दिल्ली प्रवासासाठी उड्डाण करणार आहे.