पुणे : आंबेगावात वीजचोरीवर धडक कारवाई

सुमारे पावणे दोन लाख रुपये दंडाची आकारणी करण्यात आली आहे.
mahavitaran
mahavitaransakal

पारगाव : धामणी ता. आंबेगाव येथे वीज चोरी करणारांवर महावितरण कंपनीने धडक कारवाई सरू केली असून वीज चोरी करणाऱ्या तिघांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून एकूण सुमारे पावणे दोन लाख रुपये दंडाची आकारणी करण्यात आली आहे.

लोणी येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता मारुती कळबंडे यांनी अनिल ठाकरे, मिलिंद आरुडे व सचिन आरुडे या कर्मचार्यांसह धामणी परिसरात वीजचोरी करणारांची शोध मोहीम सुरु केली असता त्यामध्ये सुहास रामदास रोडे व रामदास हरिभाऊ रोडे यांनी जय हनुमान दुध संकलन केंद्राच्या औद्योगिक वापरासाठी अनधिकृत पणे मीटर बायपास करून वीज चोरी केल्याचे आढळून आल्याने एक लाख ५० हजार ५७० रुपये दंडाची आकारणी करण्यात आली.

mahavitaran
इंदापूर : मत्स्यव्यवसायास चालना देण्यासाठी भरणे यांनी लक्ष घालणे गरजेचे

सुहास शरद तांबे यांनीही नवीन घर बांधण्यासाठी अनधिकृतपणे वीज चोरी केल्याने १५ हजार ९९० रुपयांचा दंड आकरण्यात आला तसेच सोपान भागुजी करंजखेले यांनी राहत्या घरात अनधिकृत पणे लघुदाब वाहिनीला अतिरिक्त वायर जोडून अनधिकृतपणे वीज चोरी केल्याने त्यांना ११ हजार ३५० रुपये दंडाची आकारणी करण्यात आली. अशा प्रकारे या तिघांच्या विरुध्द कायदेशीर फिर्याद देऊन एकूण एक लाख ७७ हजार ९१० रुपये दंडाची आकारणी करण्यात आल्याची माहिती कनिष्ठ अभियंता मारुती कळबंडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com