अनधिकृत टपऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

पुणे - बाजार आवारातील अनधिकृत टपऱ्या काढून टाकण्याच्या पणनमंत्र्यांच्या आदेशाला पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने केराची टोपली दाखवली आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आदेश देऊन सात दिवस झाले तरी बाजार समितीच्या प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. 

गेल्या दोन महिन्यांत भाजीपाला बाजारात गणेश मंदिरालगत दोन टपऱ्या सुरू झाल्या. या टपऱ्या सुरू करण्याबाबत प्रशासकीय मंडळच आग्रही होते. या अतिक्रमणाविषयी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही प्रशासन कारवाई करू, असे आश्‍वासन देत राहिले. प्रसार माध्यमांमध्येही याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पणनमंत्र्यांनी या तक्रारीची दखल घेत टपऱ्या काढून टाकण्यास सांगितले होते. मात्र अद्याप कारवाई झाली नाही.

संचालक मंडळाच्या बैठकीत बाजार आवारातील टपऱ्यांची संख्या आणि कायदेशीर बाबी तपासून पुढील कारवाई करणार. 
- बी. जे. देशमुख, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Web Title: Pune APMC order illegal shop