Pune : संजय माताळेंच्या धाडसाचे कौतुक ; डॉ.ज्ञानेश्वर मुळेंच्या हस्ते २१ हजार रूपयाचा धनादेश देऊन सत्कार

वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या वतीने २१ हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मान
संजय माताळेंच्या धाडसाचे कौतुक ; डॉ.ज्ञानेश्वर मुळेंच्या हस्ते
संजय माताळेंच्या धाडसाचे कौतुक ; डॉ.ज्ञानेश्वर मुळेंच्या हस्ते sakal

खडकवासला - सिंहगड पायथा गोऱ्हे खुर्द येथील धाडसी शेतकरी संजय माताळे यांचा प्रसंगावधानामुळे खडकवासला धरणात बुडणाऱ्या पाच जणींना जीवदान मिळाले होते. वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या वतीने २१ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला.

माजी परराष्ट्र सचिव व मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ.ज्ञानेश्वर मुळे, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह)- आनंद लिमये, यांच्या हस्ते संजय माताळे यांना सन्मानपत्र आणि २१ हजार रूपयाचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.

संजय माताळेंच्या धाडसाचे कौतुक ; डॉ.ज्ञानेश्वर मुळेंच्या हस्ते
Crime : पोलिसांना सलाम! छ. संभाजीनगर शहरात एकाच दिवसात 3 धार्मिक स्थळांची विटंबना पण...

सत्कार प्रसंगी तमिळनाडूचे प्रधान सचिव आनंद पाटील, राज्य मानवी हक्क आयोगाचे निवृत्त सदस्य, सेवानिवृत्त अतिरिक्त डिजीपी भगवंतराव मोरे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, साखर आयुक्त शेखर गायकवाड, कवी आणि चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे,

सहआयुक्त जीएसटी, वैशाली पतंगे, कार्यकारी संचालक, बेलरिस इंडस्ट्रीज लिमिटेड सुप्रिया बडवे, सहसंस्थापक वर्शिप अर्थ फाउंडेशनचे राज देशमुख, कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, वई कनेक्ट मॅगझिन तेजस गुजराथी, रमेश भामे, अनिल मते आदीं मान्यवर उपस्थित होते.

संजय माताळेंच्या धाडसाचे कौतुक ; डॉ.ज्ञानेश्वर मुळेंच्या हस्ते
Mumbai : आरक्षित तिकीटांवर कोण डल्ला मारते आढावा घ्या; राजू पाटील

वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या वतीने संस्थापक, वर्शिप अर्थ फाउंडेशनचे पराग मते यांनी त्यांना २१ हजार रुपयांचा धनादेश दिला. 'समाजात चांगले काम करणाऱ्या अशा खऱ्या देवदूतांचा सन्मान आम्ही फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी करतो.' असे पराग मते यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com