Army Security : संरक्षण क्षेत्रात पुणे शहराची भरीव कामगिरी

लष्कराशी संबंधित विविध शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन संस्थांमुळे भारतीय लष्कराच्या नकाशावर पुण्याचे स्थान महत्त्वाचे ठरले आहे.
Army Security
Army SecuritySakal
Summary

लष्कराशी संबंधित विविध शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन संस्थांमुळे भारतीय लष्कराच्या नकाशावर पुण्याचे स्थान महत्त्वाचे ठरले आहे.

पुणे - लष्कराशी संबंधित विविध शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन संस्थांमुळे भारतीय लष्कराच्या नकाशावर पुण्याचे स्थान महत्त्वाचे ठरले आहे. त्यात आता उद्योग क्षेत्राचीही भर पडली असून लष्करसाठी विविध प्रकारचे सुटे भाग तयार करणाऱ्या मोठ्या आणि लघुउद्योगांची संख्या शहरात वाढत आहे. तंत्रज्ञानाच्या विकासापासून ते विविध शस्त्रप्रणाली, वाहने, संसाधने आदींची निर्मितीही पुण्यात होऊ लागली आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात पुणे शहराची ही भरीव कामगिरी होत असल्याचे निरीक्षण संरक्षण क्षेत्रातील निवृत्त अधिकारी व शास्त्रज्ञांनी नोंदविले.

पुण्यात सशस्त्र दलांच्या विविध अस्थापनांबरोबर देशातील सर्वांत महत्त्वाच्या प्रशिक्षण संस्थांचाही समावेश आहे. तसेच डीआरडीओच्या प्रयोगशाळा, आयुध निर्माण कारखाना यांच्या माध्यमातून संरक्षण उत्पादने व त्यावर आधारित तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. सशस्त्र दलाच्या तिन्ही दलांचे प्रशिक्षण संस्था असलेल्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही एक महत्त्वाची संस्था म्हणून ओळखली जाते. या प्रशिक्षण संस्थेला आता ७५ वर्षे पूर्ण होत असून आतापर्यंत संस्थेतून ३८ हजारपेक्षा अधिक कॅडेट्सने यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रशिक्षणाबरोबर उच्च दर्जाचे वैद्यकीय सेवा आणि दिव्यांग जवानांच्या पुनर्वसनासाठी ‘पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्र’ ही (पीआरसी) येथे आहे.

रोजगाराचीही संधी...

आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया सारख्या केंद्र सरकारच्या संकल्पनांना चालना देत सशस्त्र दलांना लागणाऱ्या विविध तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी ‘डीआरडीओ’च्या पुण्यातील प्रयोगशाळा तसेच डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (डीआयएटी) सारख्या संस्था योगदान देत आहेत. दरम्यान हे तंत्रज्ञान खासगी उद्योगांना हस्तांतरित करत मोठ्या प्रमाणात उत्पादने केली जात आहेत. यामुळे मोठ्यापासून लघु उद्योजकांना संधी मिळत असून रोजगार निर्मिती या माध्यमातून होत आहे.

मित्रदेशांनाही प्रशिक्षण

येथील एनडीए तसेच लोणावळाच्‍या आयएनएस शिवाजी सारख्या प्रशिक्षण संस्थेद्वारे केवळ भारतीय प्रशिक्षणार्थ्यांनाच नाही तर मित्र देशातील प्रशिक्षणार्थ्यांना ही प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यात श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान, मालदीव, टांझानिया आदी अशा ३० हून अधिक मित्र देशांचा समावेश आहे. यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने भारताचे या मित्र देशांसोबत संबंध अधिक घट्ट होत आहेत. केवळ प्रशिक्षण संस्था नाही तर संयुक्त युद्ध अभ्यास देखील पुण्यात पार पडत आहेत.

प्रशिक्षण आणि शैक्षणिक संस्था

  • राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)

  • सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी)

  • आयएनएस शिवाजी, लोणावळा

  • लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई)

  • डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्‍स्ड टेक्नॉलॉजी (डीआयएटी- अभिमत विद्यापीठ)

  • लष्करी विधी महाविद्यालय (एएलसी)

  • आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एआयटी)

  • मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (मिलिट)

  • मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल (एमआयटीएस)

  • आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग

  • सर्व धर्मांचे प्रशिक्षण देणारे ‘इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इंटिग्रेशन’ (आयएनआय)

  • लष्करी क्रिडा संस्था (एएसआय)

  • टेट्रा स्कूल (टीईटीटीआरए)

यावर होत आहे काम...

मानवरहित वाहने, शस्त्रास्त्रांसाठी लॉंच सिस्टिम, क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण वाहन, ब्रिजिंग सिस्टिम, रडार, सोनार प्रणाली, विमानछत विच्छेदन प्रणाली, ‘इन्सास’ लघुशस्त्र प्रणाली, अटॅग्स तोफ, पिनाका अग्निबाण, विस्फोटक, प्रणोदन, लाइट मशिनगन (एलएमजी), दारूगोळा, सायबर सुरक्षेशी निगडित तंत्रज्ञान, रोबॉटिक्स, अभियांत्रिकी उपकरणे

लष्कराच्या महत्त्वाच्या आस्थापना...

  • दक्षिण मुख्यालय

  • लोहगाव एअर फोर्स स्टेशन

  • हवाईदलाचे ९ बेस दुरुस्ती केंद्र (९ बीआरडी)

  • आयुध निर्माण कारखाना

  • बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी)

  • औंध मिलिटरी स्टेशन

  • आयुध निर्माण कारखाना

वैद्यकीय क्षेत्र

  • कमांड हॉस्पिटल

  • खडकी रुग्णालय

  • आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस)

  • कृत्रिम अवयव केंद्र

  • स्‍पायनल कॉड इंज्युरी सेंटर

माजी सैनिकांसाठी...

  • माजी सैनिक अंशदायी आरोग्य सेवा योजना (ईसीएचएस) विभागाचे ईसीएचएस पॉलिक्लिनिक

  • सैनिक कल्याण विभाग कार्यालय

‘डीआरडीओ’च्या प्रयोगशाळा

  • शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था (एआरडीई)

  • उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या (एचईएमआरएल)

  • संशोधन आणि विकास संस्था (अभियांत्रिकी)

या उद्योग, स्टार्टअप्सचा समावेश

भारत फोर्ज, एल अँड टी, वर्ल्डवाईड ऑइल फिल्ड मशिन (डब्ल्यूओएम), निख्तीश एंटरप्रायझेस, सागर डिफेन्स इंजिनिअरिंग, कॉम्बॅट रोबोटिक्‍स इंडियन प्रा.लि. आदी.

देशसेवा बजावताना अपंगत्व आलेल्या जवानांसाठी पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्रही (पीआरसी) आहे. पुणे हे भारतातील संरक्षण दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे ठिकाण असून याचे महत्त्व ब्रिटिश राज्यकर्त्यांनीही ओळखले होते. त्यामुळे आज विविध आस्थापना पुण्यात पाहू शकतो. सैन्यदलाच्या दक्षिण मुख्यालयासह हवाईदलाच्या सुखोई या लढाऊ विमानाचे स्क्वॉड्रन येथे आहे. तिन्ही दलांच्या वेगवेगळ्या प्रकारची केंद्रे येथे उपलब्ध असून भविष्यात ही पुणे जिल्ह्याचा दर्जा प्राप्त होईल.

- काशिनाथ देवधर, निवृत्त शास्त्रज्ञ, डीआरडीओ

राष्ट्र सुरक्षा व संरक्षणावर काम करणाऱ्या अनेक थिंक टॅंक’ हे दिल्ली मध्ये आहेत. हे थिंक टँक राष्ट्र सुरक्षेच्या विविध विषयांवरील परिषद अथवा व्याख्यानासाठी परदेशातील तज्ज्ञ, तसेच सशस्त्र दलातील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांना वक्‍ते म्हणून यात सहभाग करतात. मात्र सशस्त्र दलातील अनेक निवृत्त अधिकारी हे पुण्यातही राहतात. त्यामुळे जर सुरक्षा, संरक्षण अशा विविध विषयांवरील व्याख्यान किंवा सत्राचे आयोजन करताना, या निवृत्त अधिकाऱ्यांना वक्ते म्हणून बोलाविणे शक्य आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने परदेशातील तज्ञांचा सहभाग केला जाऊ शकतो.

- भूषण गोखले, एअर मार्शल (निवृत्त)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com