पुणे : माथाडी कामगार असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

पुणे : विमाननगर येथील फिनीक्स मॉलमधील दुकानदारास माथाडी कामगार असल्याचे सांगत खंडणी मागणाऱ्यास विमानतळ पोलिसांनी अटक केली. रवि ससाणे (रा.खुलेवाडी, नगररस्ता) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव शेरी येथील 33 वर्षीय व्यक्तिने विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे फिनिक्स मॉलमध्ये दुकान आहे. 11 फेब्रुवारीला दुकानाच्या आतील बाजुस तोडफोडीचे काम सुरु होते. दुपारी एक वाजता ससाणे हा दुकानामध्ये आला. त्याने फिर्यादी यांना धमकाविण्यास सुरवात केली. "तु येथील काम बंद कर, येथे माथाडीचे काम मी पाहतो. तुला काम करायचे असेल तर मला हफ्ता द्यावा लागेल" अशी धमकी दिली. त्यानंतर वारंवार फिर्यादी यांना फोन करुन " मला हफ्ता द्यावा लागेल, नाही तर तुला जीवंत सोडणार नाही" अशी धमकीही त्याने दिली.

या सर्व प्रकाराला कंटाळून फिर्यादी यांनी पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याची गांभीर्यांने दखल घेऊन आरोपीस अटक केली.

Web Title: Pune: arrested to person Stating as Mathadi worker demand for ransom