#MITStudyTour : एमआयटीमध्ये शैक्षणिक सहलीसाठी 'बी.टेक'च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन (व्हिडिओ)

pune.jpg
pune.jpg

पुणे : कोथरुड येथील एमआयटी कॅम्पसमध्ये बी.टेक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले आहे. शैक्षणिक सहल बाबत हे आंदोलन सुरु आहे. 

बी.टेक अभ्यासक्रमादरम्यान परदेशात शैक्षणिक सहल नेणार असल्याचे सांगण्यात आले. ही सहल जवळपास तीन ते चार आठवड्यांची असेल, असेही सुरवातीला सांगण्यात आले होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी तब्बल 50 हजार रुपये भरण्यास सांगितले जातात. मात्र, आता ही परदेशातील शैक्षणिक सहल ही अवघ्या एक आठवड्यांची असेल, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे संपप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी एमआयटीच्या आवारात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com