स्वच्छ सर्वेक्षणात पुणे पिछाडीवर

स्वच्छ सर्वेक्षणात पुणे पिछाडीवर

पुणे - केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर गेल्या वर्षी दहाव्या क्रमांकावर असलेले पुणे शहर या वर्षी ३७व्या क्रमांकावर गेले. या सर्वेक्षणात राज्यातही पुणे शहराने गेल्या वर्षीचे दुसरे स्थान गमावले आहे. राज्यात या वर्षी शहर आठव्या क्रमांकावर आहे.

केंद्र सरकारच्या या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर महापालिकेने निरनिराळे प्रयोग राबविले. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या मोहिमेत पुणेकरांसोबत लोकप्रतिनिधी आणि महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. लोकसहभाग वाढविण्यासाठी स्पर्धाही घेण्यात आली. त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. परिणामी, स्वच्छ सर्वेक्षणातून पुण्याची कामगिरी अव्वल असेल, अशी आशा निर्माण झाली होती. प्रत्यक्षात मात्र एवढे प्रयोग करूनही स्वच्छ सर्वेक्षणात आपले स्थान कायम ठेवण्यात अपयश आले आहे.   

सेवा-सुविधांमुळे राहण्यासाठी सर्वाधिक पसंती पुणे शहराला असल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्याला तीन महिनेही झाले नाहीत, तोवर स्वच्छतेत पुणे मागे पडल्याचे समोर आले. स्वच्छ सर्वेक्षणात २०१७ मध्ये शहराचे अकरावे स्थान होते, २०१८ मध्ये दहावा क्रमांक मिळाला होता. यंदा मात्र त्यात चांगलीच घसरण झाली. या स्पर्धेत देशभरातील सुमारे साडेचार हजार शहरे सहभागी झाली होती. या स्पर्धेसाठी महापालिकेने तब्बल ३६ लाख रुपये देऊन सल्लागाराची नेमणूक केली होती. मात्र, या निकालामुळे हा खर्च वाया गेल्याचे स्पष्ट झाले. एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पुण्याचा ३७वा तर, १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये १४वा क्रमांक आहे.

महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, ‘‘या स्पर्धेत पुण्याचे मानांकन वाढविण्यासाठी प्रयत्न केले होते. शहर कायमस्वरूपी स्वच्छ राहावे, यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी झाली आहे. आता चांगली तयारी करून आपले स्थान पुढे नेण्याचा प्रयत्न करू.’’

स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याचे मानांकन वाढविण्यासाठी सर्व पातळ्यांवर तयारी केली होती. त्यासाठी पुणेकरांसह लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने प्रयत्न केले होते. मात्र, सादरीकरणात कमी पडल्याने हा निकाला आला असावा. आता सुधारणा केल्या जातील. 
- मुक्ता टिळक, महापौर

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com