बालगंधर्व रंगमंदिरात तिसरी घंटा वाजली!

‘देशात चित्रपटसृष्टी निर्माण झाल्यापासून सांस्कृतिक घडामोडीचे केंद्र मुंबई आणि महाराष्ट्रच राहिले आहे. मागील काही दिवसांपासून हे केंद्र राज्याबाहेर नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Balgandharv
BalgandharvSakal

पुणे - ‘देशात चित्रपटसृष्टी निर्माण झाल्यापासून सांस्कृतिक घडामोडीचे केंद्र मुंबई आणि महाराष्ट्रच राहिले आहे. मागील काही दिवसांपासून हे केंद्र राज्याबाहेर नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार आवश्यक सुविधा देऊन हे केंद्र मुंबईतच राहील, याबाबत खबरदारी घेईल,’’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवारी आयोजित नटराज पूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री जयमाला इनामदार, पूजा पवार, अभिनेते गिरीश परदेशी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या नूतनीकरणाच्या प्रस्तावावर स्थानिक कलाकारांची मते लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले, तर ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदत देेण्याचे कार्यही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Balgandharv
पुणे शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही शून्य कोरोना मृत्यूची नोंद

नाट्यगृहे आणि चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या शंभर टक्के उपस्थितीच्या मागणीवर पवार म्हणाले, भाष्य ‘‘कोरोनामुळे खबरदारी करून सर्व बाबी सुरू कराव्या लागत आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी तूर्त ५० टक्के उपस्थितीची मर्यादा आहे. राज्यात रुग्णसंख्या कमी होत असून, दिवाळीनंतर देखील अशीच परिस्थिती राहिल्यास आढावा घेऊन शंभर टक्के उपस्थितीला परवानगी दिली जाईल.’’

या वेळी पवार यांच्या हस्ते नटराज पूजन करून आणि तिसरी घंटा वाजवून नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे खुली झाल्याचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केले. या वेळी कलाकारांनी कार्यक्रम सादर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com