पुणे : ‘बालगंधर्व’ पार्किंगची जागा आता मेट्रोसाठी

शहर सुधारणा समितीसमोर प्रस्ताव मांडणार
Mahametro
Mahametro sakal

पुणे : मेट्रोच्या कामासाठी बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरातील चारचाकी पार्किंगच्या जागेपैकी १३१ चौरस मीटर जागा महामेट्रोला देण्यात येणार असून, याचा प्रस्ताव लवकरच शहर सुधारणा समितीच्या समोर मांडला जाणार आहे.

वनाज ते रामवाडी या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम सध्या सुरू आहे. नदीपात्रामध्ये खांब टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, त्यावर गर्डर टाकण्यात येत आहेत. तसेच संभाजी महाराज उद्यान येथे मेट्रोचे स्थानक असल्याने तेथून पेठांमधील नागरिकांना मेट्रो वापरता यावी यासाठी पूल बांधला जाणार आहे. त्याचेही काम नुकतेच नदीपात्रात सुरू झाले आहे.

संभाजी उद्यान येथील मेट्रो स्टेशनचे काम करताना मेट्रोला दैनंदिन पाणी वापरासाठी टाकी बांधावी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेने संभाजी उद्यानातील नदीच्या कडेची ४८० चौरस मीटर जागा महामेट्रोला देण्याचा निर्णय मार्च २०१९मध्ये घेतला होता. त्यासाठी ३ कोटी ४७ लाख ५२ हजारे जागेचे मूल्य हे मेट्रो प्रकल्पाच्या दायित्वातून वळते करून घेण्यात आले होते.

Mahametro
पुणे : ‘सवाई’ रंगणार २ फेब्रुवारीपासून

ही जागा मेट्रोला देण्याचा निर्णय झाल्यानंतरही हा भाग नदीच्या लगतचा असल्याने राष्ट्रीय हरित लवादाची (एनजीटी) परवानगी नसल्याने बांधकाम करता येणार नाही, असा आक्षेप उद्यान विभागाने घेतला. त्यामुळे जागा बदलीसाठी मेट्रोने महापालिकेकडे प्रस्ताव टाकला आहे.

पुनर्विकासास अडथळा नाही

बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव आहे, पण त्यास अद्याप मूर्तस्वरूप आलेले नाही. भविष्यात हा प्रकल्प हाती घेतल्यास मेट्रोच्या भूमिगत पाण्याच्या टाकीचा अडथळा होणार नाही. मेट्रोला दिलेली जागा ही जलतरण तलावाच्या बाजूला आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

महत्त्वाचे निर्णय

संभाजी उद्यानाला लागून बालगंधर्व रंगमंदिराच्या पार्किंगमधील १३१ चौरस फूट जागा मेट्रोला भूमिगत टाकी बांधण्यासाठी देण्यात येणार आहे१ कोटी ४२ लाख ४० हजार रुपये प्रिमियम रक्कम स्वीकारून ही जागा ३० वर्षांसाठी देण्यात येणार आहेमहापालिकेच्या स्वामित्वापोटी दरवर्षी एक रुपया दराने ही जमीन हस्तांतर केली जाणार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com