pune
punesakal

Pune : पती निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, हातातील बांगड्या फोडणे या कुप्रथांवर बंदी; मांजरीकरांचा निर्णय

चार महिन्यांपूर्वी शहरालगतच्या मांजरी खुर्द येथील ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ते अशोक आव्हाळे यांनी गावातील ही प्रथा बंद करून अशा महिलांना सौंदर्यालंकारासह सार्वजनिक कार्यक्रमात सन्मानाने सहभागी होता यावे,

मांजरी खुर्द - पती निधनानंतर पत्नीचे सौदर्यालंकार उतरवून तीचे सार्वजनिक जीवनातील सामाजिक स्थान कमी केले जाते. धर्मशास्त्रातील या कुप्रथेचे उच्चाटन करण्याचा निर्णय मांजरी खुर्द ग्रामस्थांनी घेतला आहे. नुकतीच त्याबाबतची अंमलबजावणीही करण्यात आली असून परिसरातील महिलांसह सुधारणावाद्यांकडून या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.

एकीकडे वेगवेगळ्या स्तरांवर महिलांना आपले कर्तृत्व सिध्द करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असताना दुसरीकडे पारंपरिक कुप्रथांच्या जोखडात मात्र तीला अद्यापही अडकून पडावे लागत आहे.

अशा चुकीच्या सामाजिक रूढी परंपरामुळे तीचा आत्मसन्मान खचण्याबरोबरच तीच्या जगण्याच्या हक्क आणि अधिकारांवरही गदा येत आहे. ही बाब लक्षात घेऊन मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये एकल महिलांच्या सामाजिक सन्मानाचा निर्णय घेतला आहे.

पती निधनानंतर त्याच्या पत्नीचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायाच्या बोटातील जोडवी काढणे व सार्वजनिक कार्यक्रमातील तीचा सहभाग बंद करणे ही कुप्रथा गावागावांतून आजही जोपासली जात आहे. राज्यातील काही ग्रामपंचायतींनी ही प्रथा बंद करण्याचे ठराव यापूर्वी केलेही आहेत.

चार महिन्यांपूर्वी शहरालगतच्या मांजरी खुर्द येथील ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ते अशोक आव्हाळे यांनी गावातील ही प्रथा बंद करून अशा महिलांना सौंदर्यालंकारासह सार्वजनिक कार्यक्रमात सन्मानाने सहभागी होता यावे, असा ठराव मांडला होता. प्रतिक भोसले यांनी या ठरावाला दिलेल्या अनमोदनासह ग्रामस्थांनी एकमुखाने तो संमत केला आहे.

pune
Mumbai Crime News : आमदाराच्या मुंबईतील घरी २५ लाखांची चोरी; नंतर मागितली ३० लाखांची खंडणी; प्रकारने खळबळ

नुकतेच गावातील एका प्रतिष्ठित घरातील तरूणाचे निधन झाल्यामुळे अंत्यविधीवेळी त्याच्या पत्नीच्या अंगावरील सौंदर्यालंकार न काढता ग्रामसभेत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. उपस्थित नागरिकांनी या घटनेची सकारात्मक चर्चा करीत ग्रामस्थांच्या निर्णयाचे स्वागत केले. प्रत्येक गावाने असा निर्णय घेऊन पतीच्या निधनानंतरही तीचे सामाजिक स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा सकारात्मक सूर यावेळी नागरिकांकडून ऐकायला मिळाला.

"आपण घटनेनुसार स्वातंत्र्य, समता, हक्क आणि अधिकाराचा पुरस्कार करीत असताना आगोदरच पतीच्या निधनानंतर खचलेल्या त्याच्या पत्नीचे सौंदर्यालंकार उतरवून सामाजिक जीवनात तीचे अधिकच खच्चीकरण करीत आहोत.

एकीकडे स्री मुक्तीला प्राधान्य देताना अशा कुप्रथा सुरू ठेवणे चांगले नाही. त्यामुळे गावोगावी ही प्रथा बंद करून अशा महिलांचा सन्मान वाढवला पाहिजे. ग्रामसभेत मी मांडलेला त्याबाबतचा ठराव ग्रामस्थांनी मंजूर करून त्याची अंमलबजावणीही केल्याचे समाधान आहे.'

अशोक आव्हाळे, सामाजिक कार्यकर्ते, मांजरी खुर्द

pune
Pune : ट्रक-बसचा अपघात! चांदणी चौक परिसरात लागल्या वाहनांच्या रांगा

"या निर्णयाने इतर महिलांबरोबरच एकल महिलांचा सन्मान वाढविण्याचा आदर्श मांजरी खुर्द गावाने घालून दिला आहे. ग्रामस्थांनी त्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. बदलत्या काळानुसार विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून समाजाला मागे नेणाऱ्या अशा कुप्रथा बंद करण्याचा सुधारणावादी विचार इतरही गावांनी करावा.'

सिताराम उंद्रे, सरपंच, मांजरी खुर्द

pune
Mumbai : पश्चिम रेल्वेची ७१ तिकीट दलालांना अटक! महिन्याभरात २६ लाखांची तिकिटे जप्त

"खरे तर सती प्रथेबरोबरच ही प्रथा बंद होणे आवश्यक होते. प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या पध्दतीने पती निधनानंतरची ही प्रथा जोपासली जात आहे. मांजरी ग्रामस्थांचा निर्णय इतर गावांना निश्चितपणे प्रोत्साहन देईल. या प्रथेच्या विरोधात समाजात जाणीवपूर्वक जागृती झाली पाहिजे. विविध कार्यक्रमातून अशा महिलांना सन्मानाने सहभागी करून घेतले पाहिजे.'

ॲड. असुंता पारधे, सचिव- चेतना महिला विकास संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com