
Pune : बारामतीतील केपीएल चषक कसबा वॉरीयर्सकडे...
बारामती : खेळाडूंना संधी व व्यासपीठ मिळाले तर ग्रामीण भागातूनही आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होऊ शकतात, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. येथील बारामती शहर व तालुका क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित कारभारी प्रिमिअर लिग 2023 च्या पारितोषिक वितरण प्रसंगी अजित पवार बोलत होते. आयोजक प्रशांत नाना सातव यांचे कौतुक करुन या स्पर्धेसह या क्षेत्रात सातत्य कायम टिकविण्याची सूचना पवार यांनी सातव यांना या वेळी केली.
या स्पर्धेमध्ये कसबा वॉरीयर्सने विजेतेपद प्राप्त केले. विरोधी पक्षनेते अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली गेली.
अंतिम सामन्याची नाणेफेक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या हस्ते झाली. अंतिम सामन्यात अभिजीत एकशिंगे हा सामन्याचा मानकरी ठरला. स्पर्धेचा मानकरी सुदर्शन तोरडमल यास बालन ग्रुपच्या वतीने इलेक्ट्रीक बाईक पुनीत बालन यांनी दिली.
स्पर्धेचे आयोजक प्रशांत नाना सातव यांच्या विनंतीवरुन रोहित पवार यांनी या स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे निरिक्षक पाठवले होते. उत्तम खेळ केलेल्या खेळाडूंचा आगामी काळात राज्याच्या संघासाठी विचार केला जाणार आहे.
पारितोषिक वितरणास पुनित बालन ग्रुपचे पुनित बालन, पौर्णिमा तावरे, किरण गुजर, सचिन सातव, किशोर भापकर, जितेंद्र जाधव, प्रकाश कुतवळ, अमित मोडक, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी रणजित खिरीड, तसेच क्रिकेट क्षेत्रातील अनिल वाल्हेकर, नंदकुमार शिवले, राजेश कोतवाल, दिपक गुजर उपस्थित होते.
प्रशांत सातव, सचिन माने, प्रमोद सातव, पृथ्वीराज सातव, साक्षी ढवाण, सतिश ननवरे, अॅड. श्रीनिवास वायकर, योगेश जगताप, रवींद्र काळे, वैभव काटे, नीलेश कुलकर्णी, विक्रांत तांबे, हनुमंत मोहिते, इरफानशेठ इनामदार, विनोद ओसवाल, सुजित पराडकर, अॅड. अमर महाडीक, अक्षय महाडीक, रणजित तावरे, राजन कोळेकर, सुभाष सोमाणी, राजेंद्र इंगवले, संतोष ढवाण, संतोष सातव, दशरथ जाधव यांनी सहकार्य केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप व मनिष पाटील यांनी केले.