घरफोडीच्या गुन्ह्यात फिर्यादीचा मित्रच निघाला चोर !

मिलिंद संगई
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानेच ही चोरी केल्याचे कबूल केले.

बारामती : शहरात झालेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्यात फिर्यादीचा मित्र असलेलाच चोर निघाल्याची घटना उघड झाली आहे. शहरातील जळोची परिसरात राहणाऱ्या अशोक विष्णू बांगर यांच्या घरी चोरी झाल्याचीची घटना 3 नोव्हेंबर रोजी उघड झाली.

या चोरीमध्ये इतर वस्तूंसोबत रेफ्रिजेटरही चोरट्यांनी चोरुन नेल्यामुळे पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. या बाबत पोलिसांनी आपल्या पध्दतीने तपास सुरू केल्यानंतर फिर्यादीचा मित्र असलेल्या विशाल सोन्या बापू शेरे (रा. जळोची, ता. बारामती) यानेच हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानेच ही चोरी केल्याचे कबूल केले.

त्याच्याकडून गुन्हयातील रेफ्रिजेटर पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून आणखीनही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. बारामती गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचारी शिवाजी निकम, बाळासाहेब भोई, अनिल काळे, रवीराज कोकरे, संदीप मोकाशी, संदीप जाधव, संदीप कारंडे, दशरथ कोळेकर, सदाशिव बंडगर यांनी ही कामगिरी केली. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: pune baramati news man robbed friend's house