Pune News: बारामतीत शिक्षकेतर महाविद्यालयीन कर्मचा-यांचे बेमुदत आंदोलन सुरु

सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जीवित करून पूर्ववत करणे,
Pune News
Pune Newssakal

Baramati News : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा-यांनी आजपासून (ता. 20) बेमुदत संपास प्रारंभ केला आहे. दरम्यान बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे सर्वच शिक्षकेतर कर्मचारी आज संपात सहभागी झाले आहेत.

सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जीवित करून पूर्ववत करणे, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार दहा, वीस, तीस वर्षानंतरच्या लाभाची योजना लागू करणे,

सातव्या वेतन आयोगाचा आजपर्यंतचा फरक अदा करणे, 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे अशा विविध मागण्यांसाठी महासंघाच्या व शिक्षकेतर संघटनेच्या आदेशानुसार महाविद्यालयातील कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. महाविद्यालयाच्या आवारातच शिक्षकेतर कर्मचा-यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com