Pune : बारामतीच्या दोन क्रिकेटपटूंची महाराष्ट्र प्रीमियम लीगच्या लिलाव प्रक्रीयेसाठी निवड Pune baramati sport cricket Maharashtra Premium League | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune news

Pune : बारामतीच्या दोन क्रिकेटपटूंची महाराष्ट्र प्रीमियम लीगच्या लिलाव प्रक्रीयेसाठी निवड

Pune - येथील धीरज जाधव क्रिकेट अकादमीचे वेगवान गोलंदाज मोईन बागवान व स्वराज वाबळे यांची महाराष्ट्र प्रीमियम लीगच्या निलाव प्रक्रियेसाठी निवड झाली आहे.

राज्यभरातून या लीगसाठी 250 खेळाडूंची निवड झाली असून त्यात दोन बारामतीकर आहेत. बारामतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमच्या माध्यमातून क्रिकेट संस्कृती विकसीत होत आहे. येथील खेळपट्टीवर अनेक खेळाडून तयार होत आहेत.

यापूर्वी स्वराज वाबळे याची 25 वर्षाखालील महाराष्ट्राच्या संघासाठी तसेच मोईन बागवान यांची 23 वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघासाठी निवड झाली होती.

आयपीएल नंतर ची T-20 मध्ये भारतातील सर्वात मोठी स्पर्धा असा नावलौकिक महाराष्ट्र प्रीमीयम लीग या स्पर्धेस मिळाला आहे. बारामतीत अनेक होतकरू खेळाडूमध्ये खेळाडू असून ज्यांना आगामी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धासाठी निवड चाचणीस पाठवणार असल्याचे व बारामतीतील खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ निर्माण करण्याचे आश्वासन अकादमी धीरज जाधव यांनी दिले आहे.