पुण्याची आदिती पतंगे 'मिस इंडिया वॉशिंग्टन'

आदिती पतंगेने ‘मिस इंडिया वॉशिंग्टन (Miss India Washington) यूएसए २०२१-२२’ हा प्रतिष्ठेचा बहुमान पटकावला आहे.
Miss India Washington
Miss India Washington

मूळची पुण्याची (pune based aditi patange) असलेली आणि मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर (microsoft Software Engineer) म्हणून काम करणाऱ्या आदिती पतंगेने ‘मिस इंडिया वॉशिंग्टन (Miss India Washington) यूएसए २०२१-२२’ हा प्रतिष्ठेचा बहुमान पटकावला आहे. ‘बेस्ट स्माईल’चीही ती विजेती ठरली आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात सियाटल येथे ही स्पर्धा झाली. आदिती (Aditi Patange) ही संगीता (मांडवगडे) पतंगे व प्रवीण पतंगे यांची एकुलती एक कन्या आहे. आदितीचे ४ थी पर्यंतचे शिक्षण हे पुण्यातील भारती विद्याभवन (Bharti Vidyabhavan) येथे झाले आहे.

१२ वी पर्यंतचे पुढील शिक्षण मिलेनियम नॅशनल स्कूल (Millioniam National School) येथे झाले. अवघ्या १७ व्या वर्षी ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली, तिथे आदितीने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही पदवी पेनसिल्वेनिया स्टेट युनिव्हर्सिटी मधून यशस्वीरित्या मिळवली. तिच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ती मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत झाली. बालपणापासूनच आदितीला मॉडेलिंग व अभिनयाची आवड होती. कोरोनाच्या कालावधीत तिने घरातून काम करूनचिकाटीने अम्पॉवरींग ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित 'मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए २०२१-२२' स्पर्धेत भाग घेतला. त्यात २२ स्पर्धकांमधून ती प्रथम विजेती ठरली.

Miss India Washington
Miss Maharashtra | पाहा खाकी वर्दीतील सौंदर्यवती ठरली, मिस महाराष्ट्राची मानकरी; पाहा व्हिडिओ

स्पर्धेचे विस्तारित स्वरूप टॅलेंट राऊंड, इंटरव्ह्यू, लेहेंगा राऊंड, इंट्रोडक्शन, इवेनिंग गाऊन राऊंड आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न-उत्तर राऊंड असे होते. ही स्टेट लेव्हल स्पर्धा होती. येथील सर्व स्पर्धक वॉशिंग्टन स्टेट मधील होते. ऑगस्ट २०२२ मध्ये ती नॅशनल लेव्हल 'मिस इंडिया युएसए' मध्ये वॉशिंग्टनची प्रतिनिधी म्हणून भाग घेणार आहे.

Miss India Washington
Miss Universe 2021: हरनाज संधूच्या सौंदर्यापुढे अभिनेत्रीही फिक्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com