पुण्याच्या 'मिनिएचर आर्टिस्टने साकारली अवघ्या तीन मिलिमीटरची विठ्ठलाची मूर्ती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

- लॉकडाऊनच्या काळात साकारली अवघ्या तीन मिलिमीटरची विठ्ठलाची मूर्ती 
- पुण्यातील लिखमाराम जांगिड यांनी तयार केले 40 हून अधिक लहान साधने  
- लॉकडाऊनच्या काळात मिळाली 'मिनिएचर आर्ट'ची प्रेरणा

पुणे : लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय बंद होते, वर्क फ्रॉम होम असल्याने कित्येकांच्या प्रवासाचा वेळही वाचत आहे. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या वेळेत काय करावं असा प्रश्न अनेकांना पडत होता. अश्यात लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत अवघ्या तीन मिलिमीटरची विठ्ठलाची मूर्ती तयार करून पुण्यातील 38 वर्षीय लिखमाराम (लखन) जांगिड यांनी आपला 'मिनिएचर आर्ट'चा छंद जपला आहे. तर आपल्या या उत्कृष्ट कलाकृतीची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये व्हावही यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत जांगिड म्हणाले, "माझे आजोबा हे कुशल कारागीर होते. तसेच माझे वडिलही आणि त्यांच्यामुळे मला देखील ही आवड निर्माण झाल्यामुळे चित्रकार प्रमोद कांबळे यांच्याकडून मी चित्रकला आणि शिल्पकलाचे धडे घेतले पण कधी पुढे जास्त यावर लक्ष दिले नाही. माझे किचन ट्रोली व स्टीलच्या भांड्यांचे व्यवसाय आहे. पूर्वी संपूर्ण दिवस हा दुकानातच जात होता. त्यातून कलाकृतीसाठी मला विशेष वेळ मिळत नव्हता. परंतु कोरोनामुळे दुकान बंद करावे लागेले तसेच किचन ट्रॉलीचे कामही ठप्प झाले. त्यामुळे दिवसभर घरातच बसून कंटाळा यायचा. मात्र या संपूर्ण कालावधीने माझतील त्या कलाकाराला नवी संधी उपलब्ध करून दिली. पण नेहमीच्या तुलनेत काहीतरी नवीन करायचं हे ठरवलं आणि 'मिनिएचर आर्ट'ची कल्पना सुचली. मग पहिली कलाकृती साकारली ती विठ्ठलाची मूर्ती. लाकडावर कोरीव काम केलेली ही मूर्ती फक्त तीन मिलिमीटरची आहे. त्यानंतर एक मिलीमीटर आकाराचे कमळाचे फूल, शिवलिंग, मानवी मूर्ती, कप आणि स्टील, पितळ व लाकूड वापरून तळहातावर एकत्र बसेल अशे 40 हून अधिक साधने तयार केली. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते इतके लहान असूनही वापरण्यायोग्य आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये याची नोंद करण्यासाठी मी सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे."

पुणे : भिडे पूलाजवळ सेल्फी काढताना नदीत वाहून गेलेल्या मुलांचे सापडले मृतदेह

ही शिल्पकला इतकी लहान आहे की यासाठी लेन्सचा वापर करावा लागतो आणि तितकाच वेळही द्यावा लागतो. या काळात व्यवसाय बंद झाला असला तरी माझातील कलाकार पुन्हा जागा झाला याचा आनंद आहे. इतकंच नाही तर या छंदामुळे अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा मला कोणताही मानसिक ताण जाणवला नाही. असे जांगिड यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Based miniature artist Create three millimetre statue of Vitthal