एकावेळी शिक्षण अन्‌ नोकरीचा आनंद; "कमवा व शिका'तील युवक-युवतींची भावना

एकावेळी शिक्षण अन्‌ नोकरीचा आनंद; "कमवा व शिका'तील युवक-युवतींची भावना

पुणे - बारावी झाल्यानंतर पुढील शिक्षण घ्यायचं, इतकंच ठरवलं होतं. पण, उच्च शिक्षण आणि रोजगाराची संधी एकावेळी उपलब्ध होईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण हे आज प्रत्यक्षात अनुभवते आहे, असे खेड तालुक्‍यातील निकिता कानडे सांगत होती. हवेली तालुक्‍यातील रोहन लोंढे हाही हीच भावना व्यक्त करत होता. निकिता आणि रोहनसह जिल्ह्यातील 15 युवक-युवतींची पुणे जिल्हा परिषदेच्या "कमवा व शिका' योजनेत निवड झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या सर्वांना आज नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यावेळी या सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्व काही सांगून जात होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा परिषदेची स्वतंत्र "कमवा व शिका' योजना सुरू करणारी पुणे ही देशातील पहिलीच जिल्हा परिषद ठरली आहे. आतापर्यंत फक्त विद्यापीठांमध्ये ही योजना राबविण्यात येत होती. या योजनेंतर्गत निवड झालेल्यांना सलग तीन वर्षे जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कामांचा अनुभव घेता येणार आहे. या सर्वांना पहिल्यावर्षी दरमहा प्रत्येकी आठ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी नऊ तर तिसऱ्या वर्षी दहा हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नियुक्ती पत्र प्रदान समारंभप्रसंगी बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आमदार सुनील शेळके, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, सामाजिक न्याय विभागाच्या सभापती सारिका पानसरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती रवींद्र वायकर, समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार आदी उपस्थित होते. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नियुक्ती मिळालेले विद्यार्थी 
ऋषिकेश खरात (आंबेगाव), प्रगती ढावरे व मयूर मिसाळ (इंदापूर), निकिता कानडे व मोनिका गंगावणे (खेड), स्वप्नील भोईर (जुन्नर), रक्षा कदम व सोमनाथ सोडनवर (दौंड), सोमनाथ कदम (बारामती), आदित्य माने व सागर गायकवाड (भोर), श्रेयश वेताळ, माधवी कोळी, स्नेहल धुरंधरे व रोहन लोंढे (हवेली). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com