पुण्यात कोरोनाच्या लढाईत 'स्टार्टअप'ने मारली बाजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

स्टार्टअपसाठीचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून पुणे शहर उदयास येत असल्याचे कोरोनातील संशोधनावरुन दिसत आहे. शहरातील केंद्रीय संशोधन संस्था, एनसीएल व्हेंचर सेंटर आणि खासगी नवउद्योगांनी कोविड टेस्टींग किट आणि संरक्षण उपकरणांच्या विकास आणि उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे : कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी डॉक्‍टर, पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेसारखेच 'स्टार्टअप'धारक नवउद्योजकही सरसावल्याचे चित्र पहायला मिळाले. मास्क, सॅनिटायझर, टेस्टींग किट, व्हेंटिलेटर, सर्विलन्स, पीपीई किट आदींच्या संशोधन आणि विकासामध्ये नवउद्योजकांनी आपली स्फूर्ती दाखविल्याचे पहायला मिळत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्टार्टअपसाठीचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून पुणे शहर उदयास येत असल्याचे कोरोनातील संशोधनावरुन दिसत आहे. शहरातील केंद्रीय संशोधन संस्था, एनसीएल व्हेंचर सेंटर आणि खासगी नवउद्योगांनी कोविड टेस्टींग किट आणि संरक्षण उपकरणांच्या विकास आणि उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्याचे निदर्शनास आले आहे. हे बहुतेक सर्व स्टार्टअप मागील 3 ते 4 वर्षापूर्वी सुरू झाल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारच्या वतीने कोविड-19 संबंधित नवसंशोधनासाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित केले असून, नवीन कल्पनेला योग्य ते साहाय्य या माध्यमातून केले जात आहे. स्टार्टअप्स्‌ने दाखवलेली तत्परता कोरोणाच्या लढाईसाठी एक बूस्टर डोस ठरला आहे. आत्मनिर्भर भारतासाठी अशा स्टार्टअपला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
 
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या स्टार्टअपला मिळणार प्रोत्साहन : 
कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी निश्‍चित करण्यात आलेले स्टार्टअपची क्षेत्रे : 
1) गर्दीचे व्यवस्थापन 2) जीओफेन्सिंग 3) उपयोगी साहित्य (लॉजीस्टीक) 4) हालचालींची नोंद ठेवणारे 5) निदानाची उपकरणे 6) फेक न्यूज डिटेक्‍शन 7) निर्जंतुकीकरण 8) अतिदक्षता विभागातील उपकरणे 9) वैयक्तिक संरक्षण साहित्य (पीपीई) 10) कृत्रीम बुद्धिमत्तेच्या वापरातून कॉंटेक्‍ट ट्रेसिंग 
(स्रोत : इंडिया टेक स्टार्टअप इकोसिस्टीम अहवाल) 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

देशातील स्टार्टअपचा आढावा : 
0) स्टार्टअपच्या बाबतीत भारताचा क्रमांक : तिसरा 
1) 2014 ते 19 दरम्यान नोंद झालेल्या स्टार्टअपची संख्या : 8900 ते 9300 
2) 2014 ते 19 दरम्यान स्टार्टअपमध्ये दर वर्षी होणारी वाढ : 12 ते 15 टक्के 
3) 2019 मध्ये नव्याने सुरू झालेले स्टार्टअप : 1300 पेक्षा जास्त 
4) एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक असलेले स्टार्टअप (युनिकॉर्न) : 24 
5) 2019 मध्ये सुरु झालेले युनिकॉर्न स्टार्टअप : 7 
6) जानेवारी ते सप्टेंबर 2019 मध्ये झालेली गुंतवणूक : 4.4 अब्ज डॉलर 
7) 2019मध्ये गुंतवणुकीसाठी तयार असलेल्या संस्था : 390 पेक्षा अधिक 
8) तयार झालेले रोजगार : 60,000 

कोरोनाची प्रत्येक बातमी ठरतेय पुणेकरांसाठी महत्त्वाची; कारण...

भारतीय स्टार्टअपच्या जमेच्या बाजू : 
- जगातील उभरते स्टार्टअप केंद्र 
- आधुनिक आणि जटिल तंत्रज्ञानाचा वाढता वापर 
- देशातील वाढत्या डिजिटल पायाभूत सुविधा 
- समस्यांचे समाधान देणाऱ्या स्टार्टअपची वाढती संख्या 
- देशी उत्पादनाची जागतिक मार्केटिंग 
- युनिकॉर्न स्टार्टअप्समध्ये वाढ 
- गुंतवणूकदारांची वाढती संख्या 

पुणेकरांनो कोरोनाच्या उपचाराच्या खर्चाची चिंता सोडा; ही बातमी वाचा!

पुण्यात पाणी होतय शुध्द; गोंगाटही कमी झाला

भविष्याचा वेध  
वर्ष : युनिकॉर्न स्टार्टअपची संख्या : स्टार्टअपमधील गुंतवणूक : निर्माण होणारे थेट रोजगार : अप्रत्यक्ष रोजगार 
2014
: 05 : 10 ते 20 अब्ज डॉलर : 80 ते 85 हजार : 2 ते 3 लाख 
2019 : 24 : 95 ते 101 अब्ज डॉलर : 3 ते 3.5 लाख : 11 ते 16 लाख 
2025 : 95 ते 105 : 350 ते 390 अब्ज डॉलर : 10 ते 12 लाख : 39 ते 44 लाख 

पालक म्हणतायेत, ''दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत घाई कशाला?''​

''कोरोनानंतरच्या जगात नव्याने उदयाला आलेल्या व्यवस्थांना पूरक असलेल्या स्टार्टअपची आवश्‍यकता भासणार आहे. नवी कौशल्य प्राप्त युवकांच्या जोरावर उभ्या राहणाऱ्या स्टार्टअपमध्ये जागतिक बाजारपेठ व्यापण्याची क्षमता आहे. तसेच, गुंतवणुकीसाठी भारत ग्लोबल हब बनले आहे. खऱ्या अर्थाने स्टार्टअप आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.''
- डॉ. अभय जेरे, देशाचे मुख्य नवतंत्रज्ञान अधिकारी. 

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्त्वाची बातमी; शिक्षणमंत्र्यांचे 'यूजीसी'ला पत्र

''कोविडमध्ये सामाजिक जबाबदारी म्हणून आमच्यासह अनेक स्टार्टअप्सने सहभाग घेतला आहे. त्यातून लोकल ते ग्लोबल होण्याची क्षमता देशातील स्टार्टअपमध्ये असल्याचे सिद्ध झाले आहे. बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्टार्टअपने संशोधन आणि विकासामध्ये जास्त लक्ष द्यायला हवे.''
- प्रणीत पारेकर, नवउद्योजक, विट्रो स्टार्टअप. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune is becoming important center for startups