कोरोनाच्या भितीनं सोडलं जातंय पुणं; संख्या लाखांत

मंगेश कोळपकर
Friday, 5 June 2020

अजूनही बाहेरचे लोक मोठ्या संख्येने पुण्यात आहेत. असंघटित क्षेत्रातील लोक परतले असले तरी संघटित क्षेत्रातील किंवा चांगली नोकरी असलेले लोक पुण्यात आहेत.
-  अनिल शिदोरे, सामाजिक कार्यकर्ते 

पुणे, शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी परराज्यातील कामगार, मजुरांची संख्या मोठी आहे जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने आणि ग्रामीण भागात तहसीलदारांच्या मदतीने त्यांची परत पाठविण्याची व्यवस्था केली. 
- सुभाष बागडे, उपजिल्हाधिकारी

पुणे - कोरोनाच्या भीतीमुळे आयटी व्यावसायिक, विद्यार्थी, कामगार, मजूर आदी विविध क्षेत्रातील सुमारे ३ लाख ५० हजार २०८ लोकांनी गेल्या दोन महिन्यांत पुणे सोडले आहे. प्रवासाची जी साधने उपलब्ध आहेत, त्याचा वापर करीत या नागरिकांनी पुणे शहर, पिंपरी चिचवड व पुणे जिल्ह्याच्या बाहेर पडले आहेत. तुलनेने पुण्यात बाहेरून ५-१० हजार नागरिकही आलेले नाहीत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्यात मुंबईखालोखाल पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुण्यात नोकरी, व्यवसाय, शिक्षण व कामानिमित्त राहत असलेल्या परजिल्ह्यातील तसेच परराज्यातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे १८ मार्चपासूनच त्यांनी आपापल्या गावांकडे रवाना होण्यास सुरवात केली आहे.

No photo description available.

केंद्र सरकारने मजूर, कामगारांसाठी ८ मे पासून श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या सुरू केल्या तर, २५ मे पासून देशातंर्गत विमान वाहतूक सुरू झाली आहे. देशातील २०० मार्गांवर १ जूनपासून विशेष रेल्वगाड्यांमधून प्रवासी वाहतुकीला प्रारंभ झाला आहे. एसटी महामंडळानेही पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधून १० मे पासून ४५ बसद्वारे सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी सोडले. 

No photo description available.

देशातंर्गत २५ मे पासून सुरू झालेल्या विमान वाहतुकीमध्येही सुमारे १५ हजार नागरिक पुण्याबाहेर पडले असून, सात हजार नागरिक पुण्यात आले आहेत. अनेक नागरिकांनी १७ - १८ मार्चपासून खासगी वाहनांद्वारे २००-२५० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या आपल्या गावाचा रस्ता धरला, असे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

पुणे शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात; बाधितांचे घरातच विलगीकरण 

यूपी, बिहार, मध्य प्रदेश सर्वाधिक
शहरातून रवाना झालेल्या नागरिकांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगालमधील कामगार, मजुरांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशसाठी पुणे विभागातून ६१ रेल्वेगाड्या सोडाव्या लागल्या. विविध राज्यांतील मजूर बांधकाम, कारखाने, हॉटेल, सेवा क्षेत्राशी संबंधित उद्योगांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करीत होते. पुण्यात नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदींसाठी राहणारे सुमारे २२ हजार नागरिकही गेल्या दहा दिवसांत आपआपल्या गावांकडे गेले आहेत. नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, बीड, लातूर, उस्मानाबाद, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यांसाठी बस सोडाव्या लागल्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune is being released due to fear of Corona Numbers in millions