सई ताम्हणकरचा खोचक प्रश्नावर आणि रोहित पवारांचं 'धुरळा' उत्तर

टीम ई-सकाळ
सोमवार, 23 डिसेंबर 2019

पुणे : पुण्यात नुकत्याच झालेल्या भीमथडी जत्रा या प्रदर्शनाचा समारोप झाला. पाच दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण आणि आधुनिक जीवनशैलीचा उत्तम मिलाफ या प्रदर्शनाच्या माध्यातूनू दर वर्षी पुणेकरांना अनुभवायला मिळतो. या प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी धुरळा सिनेमाच्या टीमनं हजेरी लावली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार देखील उपस्थित होते. 

पुणे : पुण्यात नुकत्याच झालेल्या भीमथडी जत्रा या प्रदर्शनाचा समारोप झाला. पाच दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण आणि आधुनिक जीवनशैलीचा उत्तम मिलाफ या प्रदर्शनाच्या माध्यातूनू दर वर्षी पुणेकरांना अनुभवायला मिळतो. या प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी धुरळा सिनेमाच्या टीमनं हजेरी लावली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार देखील उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: 15 people, people smiling, people standing

सईचा प्रश्न आणि रोहित पवारांचं उत्तर 
धुराळा या आगामी मराठी चित्रपटातील प्रमुख कलाकार सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव तसेच इतर सह कलाकारांनी भीमथडी प्रदर्शनाला हजेरी लावली होती. हा सिनेमा राजकारणावर आधारित असल्यामुळं त्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. सिनेमाचा विषय राजकारणाचा आणि व्यासपीठावर नवनिर्वाचित आमदार रोहित पवार उपस्थित होते. त्यामुळं धुराळा चित्रपटातील कलाकारांनी आमदार रोहित पवार यांच्यासोबत अनौपचारिक गप्पा सुरू केल्या. त्यावेळी एक किस्सा घडला. 'राजकारणात महिला आहेत. पण, तरीही त्यांच्या प्रगतीची दोरी पुरुषांच्याच हातात आहे. असे का?' असा प्रश्न अभिनेत्री सई ताम्हणकरनं रोहित पवारांना विचारला. त्यावेळी रोहित पवार यांनी अतिशय मिश्किलपणे त्याचे उत्तर दिले. रोहित पवार म्हणाले, 'तुम्ही हा प्रश्न ज्यांचे लग्न झाले आहे, अश्या नेत्यांना विचारायला हवा. ते सांगतील त्यांची दोरी कोणाच्या हातात आहे.' रोहित पवारांच्या या उत्तराने सभागृहात हश्या पिकला. कलाकारांनी विचारलेल्या अनेक हलक्या-फुलक्या, कधी अडचणीच्या तर, कधी विचार करण्यास लावणाऱ्या प्रश्नांना रोहित पवार यांनी प्रसंगावधान राखून उत्तरं दिली.

आणखी वाचा - उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांना नाही? कोणाला मिळणार संधी?

काय आहे धुरळा?
धुरळा हा सिनेमा एका गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीतलं राजकारण दाखवणार आहे. येत्या 3 जानेवारीला धुरळा सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमात मराठी कलाकारांची तगडी फौज आपल्याला पहायला मिळणार आहे. पुन्हा निवडणूक असा हॅशटॅग चालवून धुरळा सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात झाली. अतिशय धक्कादायक पद्धतीनं या सिनेमाचं प्रमोशन सुरू झालंय. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune bhimthadi jatra sai tamhankar asks question to ncp mla rohit pawar