पुणे-बिलासपूर मार्गावर २८ जुलैपर्यंत विशेष रेल्वे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

पुणे - प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते बिलासपूर या मार्गावर धावणारी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी २८ जुलैपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुणे - प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते बिलासपूर या मार्गावर धावणारी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी २८ जुलैपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

ही गाडी ७ जुलै ते २८ जुलैपर्यंत प्रत्येक शनिवारी पुणे स्टेशन येथून रात्री १० वाजता निघून दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता बिलासपूर येथे पोहोचेल. ६ जुलै ते २७ जुलै या काळात बिलासपूर येथून पुण्याकडे विशेष गाडी सोडली जाईल. ही गाडी प्रत्येक शुक्रवारी बिलासपूर येथून दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. या गाडीचा क्रमांक ०८२९६ हा असून, तिचे आरक्षण सुरू झाले आहे. 

गाडीचे थांबे - दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, राजनंदगाव, दुर्ग आणि रायपूर.

Web Title: pune bilaspur special railway