Pune : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे आले अंगलट

इंदापूर मध्ये एका युवकावर गुन्हा दाखल
Birthday cake cut curved sword in Curfew
Birthday cake cut curved sword in Curfewsakal

इंदापूर : वाढदिवसाच्या उत्साहाच्या भरात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे एका युवकाला अंगलट आले असून याप्रकरणी त्यांच्यावर इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार (ता.21) रोजी सायंकाळी गुन्हे शोध पथकास सचिन दिलीप सातव (रा. बिजवडी ता.इंदापूर) याचा वाढदिवसाचा केक तलवारीने कापतानाचा फोटो सोशल मिडीया वर व्हायरल होत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली.

यानुरुप प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने पोलीस नाईक सलमान खान पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, पोलीस कॉस्टेबल विनोद लोखंडे यांना कायदेशीर कारवाईचे आदेश दिले होते.

Birthday cake cut curved sword in Curfew
Pune : भारत-आफ्रिका : सहा दिवस चालणार उपक्रम संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात

त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सचिन दिलीप सातव (वय २८ वर्षे, व्यवसाय शेती रा. बिजवडी, ता. इंदापूर जि.पुणे) यांचे कडे राहते घरी जावून त्याच्याकडे तलवारी बाबत विचारणा केली असता त्याने घराच्या पाठीमागे लपवून ठेवलेली लोंखडी तलवार मिळून आली.याप्रकरणी पोलीसांनी पंचनामा करून तलवार ताब्यात घेतली व सचिन सातव यास पुढील कारवाई कामी ताब्यात घेण्यात आले.

Birthday cake cut curved sword in Curfew
Pune News: जास्त तापमानाचा हापूसला फटका

याप्रकरणी पोलीस कॉस्टेबल नंदू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगटे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने पोलीस नाईक सलमान खान, नंदु जाधव, विनोद लोखंडे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com