Pune BJP Meeting : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या आव्हानाला तोंड कसे देणार यावर चर्चेला सुरवात झालेली आहे.
BJP Meeting
BJP Meetingsakal

पुणे - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या आव्हानाला तोंड कसे देणार यावर चर्चेला सुरवात झालेली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यात होत आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात संघटनेमध्ये काय कामे केली पाहिजेत, नागरिकांपर्यंत कसे पोचायचे, विरोधकांवर मात कशी करावी यावर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मंथन होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

भाजपच्या या प्रदेश कार्यकारिणीमध्ये १२०० पेक्षा जास्त सदस्य, सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. बालगंधर्व रंगमंदिर येथे ही बैठक होणार असून, नड्डा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये बूथ सशक्तीकरण अभियानाचा आढावा, केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत, मोदी सरकारच्या या काळातील योजना घरोघरी पोचविण्यासाठी महाजनसंपर्क अभियानाची घोषणा केली जाणार आहे. तसेच राजकीय प्रस्ताव, संघटनात्मक ठरावही या कार्यकारिणीच्या बैठकीत पारीत केले जाणार आहेत. राज्यातील सध्याच्या स्थितीवर पक्षाकडून बैठकीमध्ये काय ठराव मांडले जातील याकडेही लक्ष लागले आहे.

BJP Meeting
Chandrakant Patil : एकत्रित काम केल्यास पुणेकरांची कचऱ्याची समस्या सुटेल

जे. पी. नड्डा हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर आमदार, खासदार आणि मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेणार आहेत. कर्नाटक निवडणुकीनंतर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता आहे.

अनधिकृत फ्लेक्सने अध्यक्षांचे स्वागत

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरात अनधिकृत फ्लेक्स लावून घाण करू नका असे आदेश कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना भर कार्यक्रमात दिले आहेत. मात्र, त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करून जंगली महाराज रस्त्यावर, झाशीची राणी चौकात अनधिकृत फ्लेक्स लावून राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांचे स्वागत केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com