पुणे अंधशाळेचे कार्य दिपस्तंभाप्रमाणे- पुरोहीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

हडपसर - दृष्टिहिनांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन या क्षेत्रात पुणे अंधशाळेचे सुरू असलेले कार्य दिपस्तभांप्रमाणे आहे. या क्षेत्रात कार्य करणा-या देशातील अन्य संस्थानी या संस्थेच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करायला हवे, असे मत राजस्थानचे अपंग कल्याण आयुक्त धन्ना राम पुरोहीत यांनी व्यक्त केले.

कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेला आयुक्तांनी सदिच्छा भेट देवून आयुक्तांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेला त्यांनी देणगीही दिली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अपंग विभागाच्या वैदयकीय सामाजिक कार्यकर्त्या मंजिरी देशपांडे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, सामाजिक कार्यकर्ते गणेश टिळेकर, संभाजी भांगरे, राजाराम जगताप, गणेश पाटील, अमृत लोंखडे उपस्थित होते. शाळेतील विदयार्थ्यांचा बोलका संगणक प्रशिक्षण वर्ग, लो व्हिजन सेंटर, ब्रेल ग्रंथालय आणि दृष्टिहिन विदयार्थ्यांच्या वादयवृंदांनी सादर केलेल्या गितांनी आयुक्त भारावून गेले व विदयार्थ्यांना कौतूकाची थाप दिली. 

Web Title: Pune Blind school work