पुणे : संतापाची लाट, फुले वाड्यावरील बोर्ड टाकला काढून

महात्मा फुले वाड्याच्या प्रवेश द्वारावर भाजप नगरसेविकेच्या सासूबाई च्या नावाने बोर्ड
Pune Board in name motherinlaw of BJP corporator at Mahatma Phule Wada
Pune Board in name motherinlaw of BJP corporator at Mahatma Phule Wadasakal

पुणे : महात्मा फुले वाड्याच्या प्रवेश द्वारावर भाजप नगरसेविकेच्या सासूबाई च्या नावाने बोर्ड लावण्याच्या प्रकार 'सकाळ' ने चव्हाट्यावर आणल्यानंतर त्यावर संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून आल्या. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह संघटना संस्थांनीही याचा निषेध नोंदवला. अखेर दुपारी साडेबाराच्या सुमारास समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर चढून ‘कै. लक्ष्मीबाई नारायणराव हरिहर’ नावाचा बोर्ड काढून टाकला.

१४ मार्च रोजी पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपली आहे, त्यानंतरही स्वतःच्या नावाने बोर्ड लावण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यातच २४ मे रोजी आता ऐतिहासीक महात्मा फुले वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाजपच्या माजी नगरसेविका विजयालक्ष्मी हिरहर यांच्या सासू ‘कै. लक्ष्मीबाई नारायणराव हरिहर’ यांच्या नावाचा फलक लावण्यात आला आहे.

त्याखाली मार्गदर्शक म्हणून खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक यांचे नाव आहे. तर संकल्पना म्हणून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव आहे. त्याखाली विजयालक्ष्मी हरिहर, सम्राट थोरात, आरती कोंढरे व अजय खेडेकर या चार माजी नगरसेवकांची नावे आहेत. नगरसेविकेच्या सासूचे नाव फुले वाड्यावर लावण्यात आल्याने त्यावर महात्मा फुले मंडळ, ज्योती मित्र मंडळ, अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था यांनी आक्षेप घेतला आहे. याविरोधात आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे.

'सकाळ'ने याबाबत वृत्त प्रकाशित केले. महापुरुषांच्या स्मारकाच्या ठिकाणी नगरसेवकांकडून अशाप्रकारे चमकोगिरी केली जात असल्याने समाज माध्यम माध्यमांवर यावर टीकेची झोड उठविण्यात आली. हे असले प्रकार त्वरित थांबवा आणि हे बोर्ड काढून टाका अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. याबाबत 'सकाळ'ने महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबुक व ट्विटरवर पोस्ट टाकून "छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असो वा महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, अहिल्यादेवी होळकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्वच महापुरुषांची स्मारके वा ऐतिहासिक वास्तू ही आपली प्रेरणास्थाने आहेत, त्यांचं जतन, संवर्धन करणं व पावित्र्य राखणं, ही सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे.

ज्या पुणे शहरात फुले दाम्पत्याने स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्याच पुण्यातील महात्मा फुले वाड्यावर पुण्याचे लोकप्रतिनिधी बेजबाबदारपणे इतरांचे नामफलक लावत असतील, तर हे निषेधार्ह आहे. सर्वच राजकीय पक्षांनी यातून बोध घ्यावा आणि पुणे प्रशासनाने तात्काळ या प्रकाराला पायबंद घालावा, ही विनंती" अशा शब्दांत निषेध केला.

दुपारी साडेबाराच्या सुमारास समता परिषदेचे कार्यकर्ते व महिला फुले वाडा येथे एकत्र आले. त्यांनी घोषणाबाजी करत या ठिकाणी आंदोलन केले. त्याच वेळी दोन कार्यकर्ते फुले वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर सोडून नगरसेविकेने त्यांच्या सासूबाईंच्या नावाने लावलेला बोर्ड काढून टाकला. समता परिषदेच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रदीप हूमे म्हणाले, महात्मा फुले वाडा ही अस्मिता व ऊर्जा स्थान आहे.

अशा ठिकाणी भाजपचा नगरसेविकेने यांच्या सासूचे नाव लावणे तसेच खासदार, आमदारम महापौर, यांच्यासह नगरसेवकांची नावे लावणे हा संतापजनक प्रकार आहे. त्यामुळे समता परिषदेने या ठिकाणी आंदोलन केले. ही बोर्ड मी स्वतः वर चढून काढून टाकला. यावेळी समता परिषदेचे आणि कार्यकर्ते व पदाधिकारी देखील उपस्थित होते यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तसेच महापालिकेच्या मुख्य सभेत नाव देण्याचा प्रस्ताव भाजप मंजूर केला कसा याचे उत्तर दिले त्यांनी दिले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com