पुण्याच्या महिलेनं मृत्यूनंतरही दिलं 7 जणांना जीवदान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 August 2020

हैदराबाद इथं एका रुग्णाला पुण्यातील ब्रेन डेड रुग्णाच्या फुफ्फुसामुळे जीवदान मिळालं. पुणे ते हैदराबाद हे 560 किलोमीटर अंतर एका तासात पार करून फुफ्फुस पोहोचवण्यात आलं. 

पुणे - हैदराबाद इथं एका रुग्णाला पुण्यातील ब्रेन डेड रुग्णाच्या फुफ्फुसामुळे जीवदान मिळालं. पुणे ते हैदराबाद हे 560 किलोमीटर अंतर एका तासात पार करून फुफ्फुस पोहोचवण्यात आलं. एका तासाच्या आत ही सर्व प्रक्रिया पार पाडली. रविवारी दोन्ही शहरांमध्ये वेगवेगळ्या विभागांद्वारे हा ग्रीन कॉरीडॉर तयार करण्यात आला होता. पुण्यात एका 39 वर्षीय महिलेला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर कुटुंबियांनी अवयव दानासाठी परवानगी दिली. यामुळे सात जणांचे प्राण वाचले.

काय घडले? कसे घडले? 
काही दिवसांपूर्वी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एक 39 वर्षीय महिला उपचारांसाठी दाखल झाली होती. संबंधित महिलेला केवळ तापाचे निमित्त झाले होते आणि ती चक्कर येऊन पडली होती. 15 ऑगस्ट रोजी सकाळी त्या महिलेला डॉक्टरांनी ब्रेड डेड घोषित केले होते. संबंधित महिलेच्या पतीला याची कल्पना देण्यात आली तसेच, त्यांचे अवयव दान करणे शक्य असल्याचेही सांगण्यात आले होते.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे फुफ्फुस, हृदय, दोन्ही डोळे, दोन्ही किडन्या, यकृत दान करणं शक्य होतं. पतीकडून अनुमती मिळाल्यानंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि झोनल ट्रान्सप्लॅंट को-ऑर्डिनेशन कमिटीने विभागीय आणि राष्ट्रीय पातळीवरील वेटिंग लिस्टनुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतली. यात महिलेचे फुफ्फुस हैदराबादच्या कृष्णा हॉस्पिटलमधील रुग्णाला तर हृदय चेन्नईतील एमजीएम रुग्णालयातील रुग्णाला पाठवण्यात आले. यकृत आणि डोळ्यांसाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातीलच पेशंट वेटिंग लिस्ट होते. तर, बाणेरच्या ज्युपिटर हॉस्पिटलमधील दोन रुग्णांना किडन्या (मुत्रपिंड) दान करण्यात आली. रविवारी दुपारी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती आरती गोखले यांनी दिली.

हे वाचा - कोरोना माहामारीतून आपण नक्की काय शिकलो? वाचा काय म्हणतायेत शास्त्रज्ञ

फुफ्फुस एका तासात पोहोचवलं हैदराबादला

केआयएमएस हार्ट अँड लंग ट्रान्सप्लान्ट इन्स्टिट्यूट हैदराबाद इथं एका रुग्णावर उपचार सुरू होते. त्याला टर्मिनल लंग आजार होता. रुग्णाने तेलंगणा सरकारच्या जीवनदान योजनेत त्यांच नाव नोंदवलं होतं. दरम्यान, एका खाजगी रुग्णालयाती ब्रेन डेड घोषित कऱण्यात आलेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी अवयव दान करण्यासाठी पुढाकार घेतला. तेव्हा झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर पुणे यांनी अवयव प्रत्यारोपणासाठी वेळेत पोहोचवण्यासाठी हालचाली केल्या. 

Image

तेलंगणातील जीवनदान योजनेच्या प्रभारी डॉक्टर स्वर्णलता यांनी यासाठी मार्गदर्शन केलं. तर पुण्यातून केंद्रीय समन्वयक आरती गोखले यांनी अवयव गरजू रुग्णापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी काम केलं. पुण्यात रुग्णाचे फुफ्फुस घेऊन एका चार्टर्ड विमानाने उड्डाण केलं. दोन्ही शहरांमध्ये ट्राफीक पोलिसांनी ग्रीन कॉरिडोरची सोय केली. 

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून वाढू लागला. या सगळ्या परिस्थिती लॉकडाउनच्या काळातही महाराष्ट्रातून 12 जणांचे अवयव दान करून, अनेक जणांचे प्राण वाचण्यात आले आहेत. या परिस्थितीतून पुण्यातून 9 आणि मुंबईतून 3 जणांचे अवयव देशातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या रुग्णांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचविण्यात आले आहेत.
- आरती गोखले, झोनल ट्रान्सप्लॅंट को-ऑर्डिनेशन कमिटी

हैदराबादमधील केआयएमएस हार्ट अँड लंग ट्रान्सप्लान्ट इन्स्टिट्यूटला पुण्यातून एका तासात 560 किमी दूर पोहोचवलं. त्यानंतर संबंधित रुग्णाच्या शरिरात त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. कोरोनाच्या या संकटात सध्या इतर आजारांवरील उपचारांमध्ये अनेक अडथळे येत आहेत. अशा परिस्थितीत अवयव प्रत्यारोपणासाठी पुणे ते हैदराबाद अशा हालचाली करून वेळेत अवयव पोहचवून रुग्णाला जीवनदान दिलं आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune brain dead women donate organs lung transported in an hour to hyderabad