दहशतवादी हल्ला झाला तर आपण पूर्ण तयार : नौदलप्रमुख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

भारतावर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला झाला तर आपण पूर्णत: तयार असल्याचा विश्‍वास नौदलप्रमुख सुनील लांबा यांनी व्यक्त केला आहे. नॅशनल डिफेन्स अकादमीच्या (एनडीए) पासिंग आऊट परेडनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पुणे : भारतावर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला झाला तर आपण पूर्णत: तयार असल्याचा विश्‍वास नौदलप्रमुख सुनील लांबा यांनी व्यक्त केला आहे. नॅशनल डिफेन्स अकादमीच्या (एनडीए) पासिंग आऊट परेडनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना लांबा म्हणाले, "भारतीय नौदलाची शक्ती वाढली असून प्रशांत महासागर ते अटलांटिक महासागर असा दीर्घ पल्ला आपण गाठला आहे. सैन्याची एकच शाखा युद्ध जिंकू शकत नाही. त्यासाठी नौदल, पायदल आणि वायुदल यांनी एकत्र येऊनच युद्ध लढलं पाहिजे. तिन्ही दलांची ताकद आपल्याला अजिंक्‍य बनवेल. सध्या 41 जहाचे आणि पाणबुड्या बनवल्या जात आहेत. त्या लवकरच सेवेत दाखल होतील. आपण स्वदेशी नौका बनविण्यावर भर देत आलो आहोत. आएनएस विराट आता नौसेनेत नाही. त्यासंदर्भात काय करता येईल याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे.'

भारतावर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला झाला तर आपण संपूर्ण तयार असल्याचेही ते म्हणाले. 'मी 1974 मध्ये एनडीएमध्ये आलो होतो. पुढील तीन वर्षे माझ्यासाठी आजही अविस्मरणीय आहेत', असे म्हणत लांबा यांनी एनडीएतील आठवणी जाग्या केल्या.

आपल्यासाठी देश प्रथम हवा: नौदल प्रमुख लांबा
एनडीए पासिंग आउट पॅड (फोटो)

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये २१ बालकांना नवसंजीवनी
गायक अभिजितचे ट्विटर अकाऊंट पुन्हा 'सस्पेंड'
लग्नानंतर फ्रीज, सोन्याची साखळी मागणाऱ्या पतीला अटक
हौसला बुलंद हो, तो क्या कॅन्सर, क्या दसवीं!
यूपीत मंत्र्यांकडून बारचे उद्घाटन; योगींनी मागितले स्पष्टीकरण
ब्राझीलच्या साखर उत्पादनात वाढ
आपल्यासाठी देश प्रथम हवा: नौदल प्रमुख लांबा
एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये २१ बालकांना नवसंजीवनी

Web Title: Pune breaking news pune news NDA news nda passing parade Sunil Lamba