कसब्यात कॉंग्रेसमध्ये बंडखोरी; बाळासाहेब दाभेकर अर्ज भरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Bypoll Election

Pune Bypoll Election: कसब्यात कॉंग्रेसमध्ये बंडखोरी; ज्येष्ठ नेते भरणार अर्ज

सध्या राज्याच्या राजकारणात पुण्यातील पोटनिवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका लवकर पार पडणार आहेत. कसबा मतदार संघातून कॉंग्रेसने उमेदवारी रवींद्र धंगेकर यांना दिली आहे. मात्र, कॉंग्रेसमध्ये अर्ज भरण्याबाबत बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले. (Pune Bypoll Election Kasba Congress Senior Vice President Balasaheb Dabhekar)

पुणे शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर कसब्यातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बाळासाहेब दाभेकर उद्या मंगळवार दि 7 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

तत्पूर्वी ते कार्यकर्त्यासाहित दुचाकी वाहनांच्या रॅलीत सहभागी होणार आहेत ही रॅली नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरापासून सुरू होणार आहे. तेथून पुढे केसरीवाडा गणपती, दगडूशेठ गणपती मंदिर मार्गे गणेश कला क्रिडा रंगमंचाच्या सभागृहाजवळ समाप्त होणार आहे. या रॅलीचे सांगतेनंतर श्री दाभेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

निवडणुकीकरिता भाजपकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीकरिता भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

टॅग्स :Congress