कसबा-चिंचवडमध्ये आतापर्यंतचा काय निकाल, भाजप राखणार का गड?: Pune Bypoll Results | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Bypoll Results

Pune Bypoll Results: कसबा-चिंचवडमध्ये आतापर्यंतचा काय निकाल, भाजप राखणार का गड?

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कसब्यात कांटे की टक्कर बघायला मिळत आहे. कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपमध्ये धाकधुक वाढली आहे. भाजप आणि मविआमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या फेरींमध्ये अतितटीची लढत पाहायला मिळत आहे. (Pune Bypoll Results)

कसबा-चिंचवडमध्ये आतापर्यंतचा काय निकाल काय?

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. पहिल्या फेरीअखेर धंगेकर 3000 हजार मतांनी आघाडीवर होते. मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दीड हजार मतांनी ते मागे पडले. दुस-या फेरीत अश्विनी जगताप १ हजार मतांनी आघाडीवर गेल्याचं दिसलं.

बाराव्या फेरीअखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 4 हजार 612 मतांनी आघाडीवर आहेत. १४वी फेरी अखेरीस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ४८५० मतांनी आघाडीवर आता फक्त मतमोजणीच्या सात फेऱ्या शिल्लक आहेत. प्रत्येक फेरीत धंगेकर मोठी आघाडी घेत आहेत. त्यामुळे भाजपचे हेमंत रासने सातत्यानं पिछाडीवरच आहेत. भाजपची धाकधुक वाढल्याचं बोललं जात आहे.

पिंपरी चिंचवड दहावी फेरीअखेर अश्विनी जगताप ३५,९३५ मतांनी आघाडीवर आहेत. तर नाना काटे २८,४३१ आणि राहुल कलाटे ११,४२६.