
Pune Cantonment Election : पुणे कँटोन्मेट बोर्डाचा अजब कारभार; मतदार याद्यातून अनेक नावे गायब
कॅन्टोन्मेंट : पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका ३० एप्रिल रोजी होणार आहेत. अशा प्रसंगी मतदार याद्यांतून अचानक नावे गायब झाल्याने मतदारांनी थेट पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली आहे. बोर्ड प्रशासनाने संबंधित नावे वगळताना संबंधितांना कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
सध्या १ मार्च ते ३ मार्च पर्यंत नवीन नोंदणी व नावे तपासण्याकरिता मुदत देण्यात आली होती. या संदर्भाची जाहिरात १ मार्च याच दिवशीच काही दैनिका मार्फत तर बोर्ड कार्यालयात देण्यात आली. त्यामुळे १६५० नवीन मतदारांनी आपली नावे नोंदवली आहे.
दरम्यान नोंदविलेल्या मतदारांच्या नावावर ८ मार्चपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहेत. आलेले आक्षेप आणि तक्रारींवर १३ व १४ मार्चला सुनावणी होऊन १७ मार्चला बोर्डाचे अध्यक्ष निर्णय जाहीर करणार आहेत. तर कॅन्टोमेंन्टच्या कायद्यानुसार २०२२ मध्ये अद्ययावत केलेली अंतिम मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.
नागरिकांच्या मते ही जाहिरात एक दिवस येणं अपेक्षित होते. त्यामुळे फक्त दोनच दिवस मुदती करिता मिळत असल्याने ही मुदत वाढवून द्यावी अशी मागणी घोरपडी बाजार येथील स्थानिक रहिवासी अतुल कंट्रोलु यांनी केली आहे.
मात्र, मुदत वाढवून देता येणार नाही, असे कॅन्टोमेंन्ट बोर्ड प्रशासनाकडून ते आमच्या अखत्यारीत नाही, असे बोर्डाच्या ऑफिस सुप्रिडेंट अनिता मारवा यांनी सांगितले. कंट्रोलु यांच्या वार्ड क्रमांक ७ मध्ये १५० पेक्षा लोकांची नावे यादीतून गायब केल्याची त्यांची तक्रार आहे. तर अशा अनेक केसेस आठही वॉर्डात पाहायला मिळत आहे.
कंट्रोलु यांच्या आई कामिनी कंट्रोलु यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. सध्याच्या निवडणुकीत अतुल कंट्रोलु यांना उमेदवारी दाखल करायचा आहे. मात्र आयत्यावेळी त्यांचे व त्यांच्या पत्नीचे नाव यादीतून काढले गेले. विशेष म्हणजे त्यांच्या भाडेकरूंचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आल्याने बोर्ड कार्यालयाच्या कार्यावर त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे.
बोर्डाचे नियम व त्यांच्या अटी जाचक असल्याने त्यांना न्याय मिळणे ही कठीण झाले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दरवर्षी बोर्ड कार्यालयात याद्या अपडेट केल्या जातात. यादी मध्ये नाव तपासण्याकरिता काही दिवसांची मुदत दिली जाते. या मुदतीत अनेकजण करणावस्त गैर हजर असतात. कोणी बाहेर गावी, तर अनेक जण घरे लहान व जागे अभावी घरे भाड्याने घेऊन दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले असतात. त्यामुळे मतदार यादी मध्ये त्यांची नावे घटली जात आहे.
- प्रदीप खोले, नामदेव शिंपी समाज अध्यक्ष श्रीराम मंदिर, एम जी रोड
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड कडून ज्यावेळी टॅक्स भरण्याच्या पावत्या घरोघरी दिल्या जातात. त्यावेळीच मतदार यादीतून नाव वगळताना किंवा नवीन टाकण्यासाठी टॅक्स पावती बरोबरच या सूचना नागरिकांना द्यायला हव्यात. बोर्डाच्या या कारभारामुळे हजारो नागरिक यंदा मतदानापासून वंचित राहणार आहे.