पुणे कँटोन्मेंट बोर्डाचा निवडणूक कार्यक्रम घोषित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Cantonment Board

पुणे छावणी ( कँटोन्मेंट) परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच घोषित करण्यात आल्या. त्यानुसार दि. ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Pune Cantonment Board : पुणे कँटोन्मेंट बोर्डाचा निवडणूक कार्यक्रम घोषित

कँटोन्मेंट - पुणे छावणी ( कँटोन्मेंट) परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच घोषित करण्यात आल्या. त्यानुसार दि. ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता दि. २० व २१ मार्च रोजी सकाळी १०:३० वा. पासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष आर.आर कामत यांनी परिपत्रकाद्वारे जारी केली आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये आठ वॉर्ड असून त्यापैकी वॉर्ड क्र. १ सर्वसाधारण, वार्ड क्रमांक २ - महिलांकरिता राखीव, वार्ड क्रमांक ३- सर्वसाधारण, वार्ड क्रमांक ४- अनुसूचित जाती करिता राखीव (sc), वॉर्ड क्र. ५ व ६ महिलांकरिता राखीव, तसेच वॉर्ड क्र. ७ आणि ८ - सर्वसाधारण उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आले आहे.

आज दि. १ मार्च रोजी निवडणुकीच्या कार्यक्रमाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दि. १ ते ३ मार्च या दरम्यान नव मतदारांना नाव नोंदवता येणार आहे. यावेळी या मतदारांची दि.६ मार्च रोजी यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच सैनिक मतदारांची यादी अपडेट करून संबंधित अधिकाऱ्यांकडून मागविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचाही नावाचा समावेश करण्यात येईल.

नव मतदारांच्या यादीतील नावावर दि. ८ मार्च रोजी आक्षेप घेण्याची मुदत ठेवली आहे. दि. १३ व १४ मार्च रोजी सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर दि. १७ मार्च रोजी बोर्डाचे अध्यक्ष निर्णय घेतली. त्या कारवाईवर दि. १६ मार्च पर्यंत अपील करण्याची मुदत दिली आहे. त्यावर बोर्डाचे अध्यक्ष दि.१७ मार्च रोजी निर्णय घेतील. दि. १८ मार्च रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच उमेदवारी अर्ज स्वीकारण्याकरिता दि. १६ ते १८ मार्च रोजी सकाळी १०: ३०वा. ते दुपारी १:३० वाजेपर्यंत तसेच दुपारी २:३० ते ४:५० वाजे. पर्यंत वेळ देण्यात आली आहे.

दि. २१ मार्च रोजी सायं. ५ वाजे नंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. पुढे दि. २३ मार्च रोजी सकाळी १० ते ५ वाजे. पर्यंत अर्जाची छाननी करण्यात येईल.

दि. २४ मार्च रोजी सायं. ४ वाजे. पर्यंत अर्ज माघार घेण्याची वेळ देण्यात आली आहे. दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायं ६ वा. पर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :puneelectionAnnouncement