Vidhan Sabha 2019 :  पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात एकजुटीने काम करा; चंद्रकांत पाटलांचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

महायुतीच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले पाहिजे, कारण एकीतच यश आहे. आपण वेगवेगळ्या दिशेने चाललो तर यश मिळणे कठीण आहे, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

विधानसभा 2019
पुणे कॅन्टोन्मेंट : महायुतीच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले पाहिजे, कारण एकीतच यश आहे. आपण वेगवेगळ्या दिशेने चाललो तर यश मिळणे कठीण आहे, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

भाजप-शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांच्या सोमवार पेठ येथील प्रचार कार्यालयात महायुतीचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.

या विधानसभा निवडणुकीत भरघोस यशासाठी मोदी, अमित शहा, रामदास आठवले, उद्धव ठाकरे यांच्यासह मी स्वतः वेगवेगळ्या भागांत सभा घेत आहे. सामान्य कार्यकर्त्यांनीही त्यात आपले योगदान दिल्यास आपल्याला व्यापक यश मिळू शकेल, असेही पाटील यांनी सांगितले.

यावेळी पाटील यांनी निवडणूक प्रचाराचा आढावा घेत कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. तसेच येत्या 17 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यात होणाऱ्या सभेला येण्याचे निमंत्रणही त्यांनी सर्व उपस्थितांना दिले.

बहुजन समाज पक्षाचे प्रदेश सचिव चंद्रकांत कांबळे यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. महायुतीच्या वतीने माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले.

उत्तर प्रदेशातील आमदार रवी सतिजा, सदानंद शेट्टी, सुधीर जानज्योत, भाजपचे सरचिटणीस गणेश बीडकर, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, आरपीआयचे शहरप्रमुख अशोक शिरोळे, शिवसेनेचे अभय वाघमारे, नगरसेविका पल्लवी जावळे, आरपीआय (ए) च्या नगरसेविका हिमाली कांबळे, युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, सरचिटणीस महिपाल वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष नीलेश आल्हाट, सुखदेव अडागळे, भाजप-शिवसेना आणि आरपीआय (ए) चे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Cantonment constituency work in unity Advice for Chandrakant Patil