Pune: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांना चंद्रकांत पाटलांचा दिलासा; आता दंड नाही तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

Pune: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांना चंद्रकांत पाटलांचा दिलासा; आता दंड नाही तर...

पुणेः पुण्यातील वाहतुकीची समस्या सर्वश्रूत आहे. आता दिवाळीच्या काळात तर बाहेर पडायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो. ज्याला-त्याला पुढे जायचं असतं. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. अशा नियम मोडणाऱ्यांना चक्क दिलासा देण्याचं काम चंद्रकांत पाटलांनी केलंय.

पुढील दहा ते पंधरा दिवस वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना कसलाही दंड अथवा शिक्षा होणार नाहीये. कारण पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसे निर्देशच दिलेत. त्यामुळे दिवाळीच्या काळातच वाहतूक नियम पाळले जाणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जिल्हा आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पोलिसांना निर्देश देत, चलन फाडण्यात वेळ घालवू नका, नियम मोडणाऱ्यांना बाजूला घेऊन समज द्या, असं सांगितलंय.

सध्या दिवाळीनिमित्त खरेदीसाठी पुणेकर बाहेर पडत आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य भागांत वाहतूक कोंडी होत आहे. पोलिसांवरही ताण येतोय. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या निर्देशांमुळे वाहतूक समस्या सुटणार की वाढणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.