Pune: साडीच्या मोहापायी गमावली सोन्याची पोत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CHAIN SNACTHING.jpg

पुणे : साडीच्या मोहापायी गमावली सोन्याची पोत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : परिसरातील एका श्रीमंत व्यक्तीला मुलगा झाला असून तो साडी आणि पैसे भेट देणार आहे. तुम्हाला देखील ही भेट हवी असेल तर गळ्यातील पोत काढून पिशवीत ठेवा, असे सांगत दोन चोरट्यांनी एका महिलेची सोन्याची पोत पिशवती ठेवण्याच्या बहाण्याने चोरली व फरार झाले.

येरवडामधील चित्रा चौकात शनिवारी (ता.१३) दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. येरवडामधील गणेशनगरमध्ये राहणाऱ्या एका ६३ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघा चोरट्यांवर येरवडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी फिर्यादी महिला या त्यांच्या घरापासून जवळ असलेल्या सोनाराच्या दुकानात जात होत्या.

हेही वाचा: विमान कंपन्यांच्या अज्ञानाचा पुण्यातील प्रवाशांना आर्थिक फटका

त्यावेळी दोन्ही आरोपी त्यांच्याजवळ आले व त्यांना म्हणाले, परिसरातील एका श्रीमंत व्यक्तीला मुलगा झाला आहे. त्यामुळे तो येथील महिलांना साडी आणि पैसे भेट देणार आहे. या भेटवस्तु घेण्यासाठी गळ्यातील पोत पिशवीत काढून ठेवा. आरोपींनी सांगितल्यानुसार फिर्यादी यांनी गळ्यातील पोत त्यांच्याजवळ असलेल्या फळांच्या पिशवती ठेवत होत्या. त्यावेळी आरोपींना फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवून ठेवले व त्यांची ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरली. त्यानंतर चोरटे तेथून फरार झाले. बतावनी करीत आरोपींनी सोन्याची पोत चोरल्याचे लक्षात आल्यानंतर महिले पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली आहे.

loading image
go to top