पुण्यात सहा ते अकरा वयोगटासाठी लवकरच होणार लसीकरण सुरू

सहा ते अकरा वर्षे वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टप्पा आता सुरू होणार आहे. हा टप्पा सुरू करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.
Vaccination
VaccinationSakal
Summary

सहा ते अकरा वर्षे वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टप्पा आता सुरू होणार आहे. हा टप्पा सुरू करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.

पुणे - सहा ते अकरा वर्षे वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा (Corona Preventive Vaccination) टप्पा आता सुरू होणार आहे. हा टप्पा सुरू करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने (Pune Municipal) या वयोगटाला लस देण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधक लस हाच एकमेव प्रभावी उपाय असल्याचे तिसऱ्या लाटेने अधोरेखित केले आहे. कोरोनाच्या ऑमिक्रॉन या व्हेरियंटमुळे तिसरी लाट निर्माण झाली होती. पण, त्याच वेळी पुणे शहरासह राज्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. ९० टक्के नागरिकांचा पहिला तर, ७८ टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाल्याची नोंद सार्वजनिक आरोग्य खात्यात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला तरीही त्यामुळे उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प होते. तसेच, अतिदक्षता विभागातील रुग्णांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात वाढली नाही. त्याचा परिणाम मृत्यूदर नियंत्रित ठेवण्यात झाला. या पार्श्वभूमिवर देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा संथ गतीने वाढत असल्याचे निरीक्षण केंद्रीय आरोग्य खात्याने केले आहे. त्यामुळे लसीकरणाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

वरिष्ठ पातळीवर नियोजन

आतापर्यंत १२ वर्षे वयोगटापुढील सर्वांसाठी लस उपलब्ध करून देण्यात सरकारला यश आले आहे. आता त्याचा पुढचा टप्पा सहा ते अकरा वर्षे वयोगटाच्या लसीकरणाचा आहे. त्याची तयारी आरोग्य खात्याच्या पातळीवर सुरू आहे. त्या पार्श्वभूमिवर वरिष्ठ पातळीवर नियोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातही या वयोगटातील मुला-मुलींना लस देण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती पुढे आली.

वय वर्षे ६ ते ११ वयोगटाच्या लसीकरणाबाबत अद्याप सूचना आलेल्या नाहीत. पण, त्या आल्यानंतर लसीकरण सुरू होईल. पुण्यातील एकूण लोकसंख्येच्या ९.६८ टक्के विचार करावा लागेल. चार लाख सात हजार ५८५ मुला-मुलींना लस देण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. लसीकरण केंद्र निश्चित करायची, हे महापालिका आयुक्तांशी चर्चा करून निश्चित केले जाईल.

- डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com