पुण्यात रस्ता ओलांडताना मोटारीने उडवले; मुलगा ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

पुणे : बाणेर येथे रस्ता ओलांडणाऱ्या तिघांना मोटारीने उडविल्याची घटना आज (सोमवार) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला असून, त्यांची आई गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील डी मार्टमधील खरेदी झाल्यानंतर इशिता व साजिद ही आपल्या आईसोबत घरी निघाले होते. रस्ता ओलंडताना ते दुभाजकावर उभे होते. यावेळी वेगात आलेल्या मोटारीने तिघांनाही जोरात धडक दिली. या घटनेत एक मुलगाचा मृत्यू झाला असून आई आणि आणखी एक मुलगा गंभीर जखमी आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महिला पुण्याहून बालेवाडीच्या दिशेने निघाली होती. बाणेरमध्ये आल्यावर मोटारीवरील नियंत्रण सुटल्यामुळे तिने तिघांना जोरदार धडक दिली. ही मोटार एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी चालवत असल्याचे समजते. या अपघातामध्ये चालक महिलाही जखमी झाली आहे. अपघातानंतर चालक महिला मोटारीमधून उतरत जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहे.

Web Title: Pune: childrens died in car accident in baner