child vaccination
child vaccinationsakal media

पुणे : मुलांचे लसीकरण आजपासून

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लहान मुलांसाठीच्या टप्प्याला उद्यापासून (ता. ३) सुरुवात होणार आहे.
Summary

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लहान मुलांसाठीच्या टप्प्याला उद्यापासून (ता. ३) सुरुवात होणार आहे.

पुणे - कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा (Vaccination) लहान मुलांसाठीच्या (Children) टप्प्याला उद्यापासून (ता. ३) सुरुवात होणार आहे. त्यानुसार १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात एक या प्रमाणे चाळीस केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या सर्व ठिकाणी कोव्हॅक्सिनची (Covaxin) लस दिली जाणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयात सकाळी दहा वाजता या लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे.

नाताळच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांचे लसीकरण मोहीम सुरू करण्याविषयी जाहीर केले होते. त्यानुसार महापालिका उद्यापासून प्रारंभ करणार आहे. मुलांच्या लसीकरणासाठी नाव नोंदणी शनिवारपासूनच सुरू झाली होती. ५० टक्के ऑनलाइन आणि ५० टक्के ऑफलाइन असे नियोजन केले आहे. त्यामुळे ५० टक्के मुलांना ‘ऑन दि स्पॉट’ येऊन नोंदणी करता येणार आहे. २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले या लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत.

child vaccination
पुण्यात रविवारी ५२४ नवे कोरोना रुग्ण; जिल्ह्यात ८५० रुग्ण तर दोघांचा मृत्यू

केंद्र सरकारच्या कोविन पोर्टल किंवा ॲप्लिकेशनवर नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय लसीकरणाच्या प्रत्येक दिवशी सकाळी आठ वाजता नोंदणीसाठी स्लॉट ओपन केला जाणार आहे. लसीकरणाला येताना लाभार्थ्याकडे आधारकार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अत्यावश्‍यक आहे.

१० हजार मुलांना डोस देण्याचे नियोजन

शहरातील ४० केंद्रांवर हे लसीकरण होणार असून, प्रत्येक केंद्रावर २५० लशीचे नियोजन केले आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी दोन किंवा तीन स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी सुमारे १० हजार मुलांना डोस देता येईल असे हे नियोजन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com