पुणेकर घेतात प्रत्येकी तीनशे लिटर पाणी - महाजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

पुणे - ""पुण्यात प्रति व्यक्ती तीनशे लिटर पाणीपुरवठा केला जात असून, तो जादा आहे. महापालिकेने पाणीपुरवठ्यातील 40 टक्के गळती थांबवावी,'' असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी स्पष्ट केले. पुण्याचा पाणीपुरवठा आज जलसंपदा विभागाने बंद केल्यासंबंधी विचारले असता, महाजन म्हणाले, ""पाणी कापल्याशिवाय पालिकेला काही कळतच नाही, तर मग काय करायचे?''

पुणेकर रोज प्रत्येकी तीनशे लिटर पाणी वापरत नाही, ही माहिती चुकीची आहे, अशी विचारणा केली असता, महाजन म्हणाले, ""आमचा अभ्यास झाला आहे. मी महापालिका आयुक्तांशीही बोललो आहे. महापालिकेने पाणी गळती न थांबविल्यास, शेतीला पाणीपुरवठा करणे अवघड होईल. करारानुसार महापालिकेला 11.5 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी दिले पाहिजे. महापालिका 14 टीएमसीपेक्षा जास्त पाणी वापरते.''

धरणांत पुण्यासाठी ऑगस्टपर्यंतचा पाणीसाठा राखून ठेवण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या मागणीबाबत महाजन म्हणाले, की "पुरेसे पाणी राखून ठेवले जाईल. मात्र, वारंवार सूचना, नोटिसा दिल्यानंतरही महापालिका धरणांतून जादा पाणी घेत आहे. प्रति व्यक्ती 180 लिटर पाणी देण्याचे जागतिक पातळीवर मान्य झाले आहे. पुण्यात तीनशे लिटर पाणी वापरले जाते.' महापालिकेने जादा पाणी घेतल्याने, जलसंपदा विभाग पुन्हा कारवाई करणार का, या प्रश्‍नाला उत्तर देताना महाजन म्हणाले, की पुण्याला पाणी दिले जाईल. मात्र पाण्याचे नियोजन आवश्‍यक आहे.

Web Title: Pune citizen take three hundred liters of water each - Mahajan