पुणे शहरात अपुऱ्या पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water supply

पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

पुणे शहरात अपुऱ्या पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण

पुणे - पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना फोन करून तक्रार करण्याचा प्रयत्न केला तरी शून्य प्रतिसाद मिळत आहे. पाणी पुरवठा बंद असल्याचे जाहीर करताना प्रशासनाने गोंधळ घालून ठेवला. त्यानंतर आत गुरूवारी (ता. ६) पाणी बंद होते, त्यानंतर कोथरूड, बावधन, औंध, शिवाजीनगर सह इतर भागात सलग तीन दिवस नागरिकांना अपुरे व कमी दाबाने पाणी मिळत असल्याने या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणे १०० टक्के भरलेली असली तरीही शहरात नागरिकांना पाणी टंचाइला सामोरे जावे लागत आहे. ठरलेल्या वेळेला पाणी न येणे, पाणी कमी दाबाने असल्याने पुरेसे पाणी न मिळणे, अचाकन पाणी गेल्याने पुन्हा टँकर मिळविण्यासाठी धावाधाव करणे असा अनेक समस्यांना नागरिक तोंड देत आहेत. वीज पुरवठा खंडीत होत असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला असे सांगून महापालिका महावितरणवर याचे खापर फोडत आहे. तर महावितरणने महापालकेच्या यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्यानेच ही स्थिती ओढावली असल्याचे सांगितले. हे दोन्ही विभागा एकमेकांकडे बोट दाखवत असले तरी यातून पुणेकरांना दिलासा मिळालेला नाही.

पुणे शहरात ६ ऑक्टोबर रोजी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पण पाणी पुरवठा विभाग आणि जनसंपर्क विभाग यांच्यात समन्वय नसल्याने पाणी बंद असलेल्या भागाची आर्धीच यादी जाहीर झाली. त्यानंतर चूक लक्षात येताच दुसऱ्या दिवशी उर्वरीत यादी जाहीर केली. पण ययाळे अनेक नागरिकांना पाणी बंद असल्याचे लक्षात आले नाही. दसऱ्यामुळे बुधवारी पाण्याचा वापर झालेला असताना गुरूवारी पाणी मिळाले नाही. त्यानंतर शुक्रवारी पाणी पुरवठा सुरळीत होणे अपेक्षीत होते. पण बाणेर, औंध, बावधन, राष्ट्रीय महामार्गाचा परिसर, चांदणी चौक, डावी व उजवी भुसारी कॉलनी, औंध, शिवाजीनगर,आपटे रस्ता, वैदवाडी, जनवाडी, गोखलेनकर, एकतानगर, आशानगर, म्हाडा कॉलनी, कपिला हौसिंग सोसायटी, तळजाई पठार, सहकारनगर दोन, लकाकी कॉलनी, तावरे कॉलनी, शिवदर्शन, वाळवेकरनगर, संत नगर या सह इतर भागात गेल्या तीन दिवसांपासन कमी दबाने पाणी येत असल्याने नगारिकांना पाणीला सामोरे जावे लागले. शिवाजीनगर, गोखलनगर या परिसरात गेल्या १५ दिवसांपासून कायमच पाणी पुरवठा अपुरा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात आमादर सिद्धार्थ शिरोळ यांनी महापालिकेच्या अधिकऱ्यांची भेट घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

‘बाणेर भागात गेल्या तीन दिवसांपासून पाणी येत नाही. आमच्याकडे तसेही पूर्वीपासून पाणी कमी आहे, पण गुरुवारनंतर ते पाणी देखील मिळाले नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी टँकरसाठी फोन केले तर त्यांचे फोन बंद आहेत. पाणी नसल्याने प्रचंड त्रास हन करावा लागला. शेवटी खासगी टँकरने पाणी मागवावे लागले आहे.’

- संजय काळे, नागरिक, बाणेर

‘महापालिकेने गुरूवारी पाणी बंद ठेवले, पण त्यानंतर शुक्रवारी, शनिवारी नागरिकांना मिळाले नाही. अतिशय कमी दाब असल्याने व उशीरा पाणी आल्याने नागरिकांचे हाल झाले. गेले दोन दिवस नागरिक पाण्याची मागणी करत आहेत. त्यातच गुरूवारी पद्मावतीचा टँकर भरणा केंद्र बंद ठेवल्यानेही पाणी मिळाले नाही. काही नागरिकांना बुधवारी सकाळी पाणी मिळाले, त्यानंतर अजून पाणी आले नाही. पाण्याचे कॅन विघत घेऊन पाणी वापरावे लागले आहे.’

- अश्‍विनी कदम , माजी नगरसेविका

टॅग्स :puneWater supplyDecrease