जलपर्णीचे 'टेंडर' कोणाचे, 'खिशे' ओले झाले कोणाचे?; पुणेकरांना प्रश्न

poster
poster


पुणे : 'जलपर्णीचे 'टेंडर' कोणाचे, 'खिशे ओले झाले कोणाचे', सांग सांग भोले....'नाथ...' हे कारस्थाऩ कोणाचे' अशा आशयाचे बॅनर पुण्यात झळकले आहेत. 

तलावांत जलपर्णी उगवली नसतानाही तिच्या नावाखाली पुणेकरांचे तब्बल २३ कोटी हडप करण्याचा महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी आणि ठेकेदारांचा डाव ‘सकाळ’मधील वृत्तामुळे उधळला गेला आहे. या जलपर्णीच्या टेंडरच्या प्रश्नाची दखल सर्व स्तरावर घेतली जात आहे. जलपर्णीचे टेंडर बाबत अज्ञातांनी पोस्टर लावून जाब विचारला आहे. 

तलावांतील जलपर्णी काढण्याची निविदा आठपट जादा दराने आल्याची कबुली प्रशासनाने दिल्यानंतर, या प्रक्रियेची माहिती २४ तासांत सादर करण्याचा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी दिला. ही मुदत उलटून गेल्यानंतरही महापालिका प्रशासनाने अहवाल महापौरांपुढे आज सायंकाळपर्यंत मांडलाच नव्हता. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे कारण पुढे करीत महापौरांच्या आदेशावर कार्यवाही झाली नसल्याचे प्रशासनाने सांगितले. पण या विरोधात पुणेकरांनी देखील या बॅनरमार्फत प्रशासनाला जाब विचारण्यास सुरवात केली आहे. प्रशासन याविरोधात काय भूमिका घेईल हाच प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com